ETV Bharat / state

Market Committee Election : अमरावती जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणुकीची लगबग; २९ जानेवारीला होणार मतदान - 12 Agricultural Produce Market Committees Election

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका Elections of Agricultural Produce Market Committee रखडल्या होत्या.परंतु आता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूकीचा 12 Agricultural Produce Market Committees Election कार्यक्रम जाहीर झाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार
कृषी उत्पन्न बाजार
author img

By

Published : Sep 12, 2022, 1:16 PM IST

अमरावती : कोरोना संसर्गमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका ( Elections of Agricultural Produce Market Committee ) रखडल्या होत्या.परंतु आता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूकीचा ( 12 Agricultural Produce Market Committees Election ) कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्वच बाजार समित्यांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. तब्बल २ वर्षानंतर जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणूक होत आहे.

जानेवारीला होणार मतदान - सेवा सहकारी ग्रामपंचायत अडते व्यापारी, मापारी अशा चार मतदारसंघांनी आहे जुन्याच पद्धतीने निवडणूक पार पडणार आहे २७ सप्टेंबर पासून मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २९ जानेवारी २०२३ रोजी मतदान ( Elections to Agricultural Produce Committee ) होणार असल्याचा संभाव्य कार्यक्रम प्राधिकरण कडून जाहीर करण्यात आला आहे. तरी निवडणुकीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता सहकार क्षेत्रातील सूत्राकडून वर्तवण्यात आली आहे.

या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होणार निवडणूक - अमरावती, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, वरुड ,धामणगाव रेल्वे ,मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, धारणी ,तिवसा, दर्यापूर व चांदुर रेल्वे या 12 कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत २ वर्षांपूर्वी संपलेली आहे. तब्बल दीड वर्षापासून या बाजार समित्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्चपासून या बाजार समित्यांवर प्रशासक आहेत.

असा राहील निवडणूक कार्यक्रम - ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान प्रारूप मतदार यादी तयार करणे. १४ ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप हरकती स्वीकारणे. ७ डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध करणे. २३ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे. २३ ते २९ डिसेंबर दरम्यान नामांकन दाखल करणे. ३० डिसेंबरला छाननी. २ ते १६ जानेवारी दरम्यान अर्ज मागे घेणे. २९ जानेवारीला मतदान आणि ३० जानेवारीला मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम राहणार असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे.

प्रचलित पद्धतीने होणार निवडणूक - बाजार समितीत शेतकरी नसलेले संचालक निवडून येतात त्यामुळे शेतकऱ्यांशी निगडीत असलेले संचालक मंडळ राहावे यासाठी शासनाने जुने निकष रद्द करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना मताधिकार देण्याचा निर्णय घेतला. मात्र याचा आदेश अध्याप निर्गमित झालेला नाही त्यामुळे बाजार समितीमध्ये होणाऱ्या निवडणूक प्रचलित निकषानेच होणार आहे.

शासकीय सदस्यांसाठीचे लॉबिंग ठरले व्यर्थ - बाजार समित्यांवर प्रशासकाऐवजी अशासकीय सदस्य निवडीसाठी सुरू असलेला खटाटोप व्यर्थ ठरला आहे. प्रत्येक बाजार समितीमध्ये सत्ता घटकातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.