अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य धनुर्विद्या अकादमीचा डंका देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा वाजत आहे. याच अकादमीची एक नवव्या वर्गात शिक्षण शिकणारी विद्यार्थीनी मंजिरी अलोने हिने अमरावतीचे नाव देशात सुद्धा गाजवले आहे. पोलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत तिने कांस्यपदक पटकावत अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिने कांस्यपदक प्राप्त केल्यानंतर नांदगाव खंडेश्वर येथे तिचा गावकऱ्यांनी जंगी सत्कार व स्वागत केले. आता ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा तीने निर्धार केलाय.
अमरावतीमधील सावनेर या अतिशय छोट्या गावातील मंजिरी अलोने या युवतीने कुटुंबातील तरुणीने पोलंड येथे झालेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतातील क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली होती. या स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. विशेष म्हणजे मंजिरीने ज्या भारतीय संघात खेळली. त्या भारतीय संघाने सुद्धा या स्पर्धेत पदक मिळवले, असा दुहेरी मान मिळाला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवल. यात मंजिरी अलोणे ही एकलव्य गुरुकुल स्कूल मध्ये वर्ग नववीची विद्यार्थिनी असून तिने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मागील तीन वर्षापासून ती एकलव्य अकादमीत तिरंदाजीचे धडे गिरवत आहे. या अकादमीत एकलव्य अकादमीचे संचालक व प्रशिक्षक सदानंद जाधव यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू देश-विदेशात झालेल्या स्पर्धेत खेळाडूंनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. तर कांस्यपदक मिळवल्यानंतर प्रथमच अमरावतीत ती आपल्या अकादमीत आली त्यामुळे नांदगाव खंडेश्वर येथे तिचे जंगी स्वागत करण्यात आले.