ETV Bharat / state

बकऱ्या चराईसाठी गेलेल्या वृद्धाची अमरावतीत केली गळा चिरुन हत्या

भीमसेन धुर्वे व त्यांचे व्याही सोमाजी मलजी उईके (वय 60) हे दोघेही सकाळी पिंपरी गावालगतच्या जंगलात बुधवारी बकऱ्या घेऊन चारण्याकरता गेले होते. मात्र, ते घरी परतलेच नाही.

बकऱ्या चराईसाठी गेलेल्या वृद्धाची अमरावतीत गळा चिरुन हत्या
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:48 PM IST

अमरावती - वृद्ध व्यक्तीचा गळा चिरुन निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी गावालगतच्या जंगलात घडली. मोर्शी तालुक्यातील गणेशपूर-पिंपरी येथील भीमसेन अम्रुत धुर्वे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

बकऱ्या चराईसाठी गेलेल्या वृद्धाची अमरावतीत गळा चिरुन हत्या

हेही वाचा- वन्य हत्ती विरुद्ध माणूस संघर्ष : आसाममधील 'या' तरुणाने शोधला अनोखा उपाय... आता हत्तीही खूश आणि शेतकरीही!

भीमसेन धुर्वे व त्यांचे व्याही सोमाजी मलजी उईके (वय 60) हे दोघेही सकाळी पिंपरी गावालगतच्या जंगलात बुधवारी बकऱ्या घेऊन चारण्याकरता गेले होते. रात्री अंधार पडला तरीही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या दोघांचाही शोध लागला नाही. बकऱ्याही दिसून आल्या नाहीत. त्यामुळे पिंपरी येथील पोलीस पाटील धनंजय पांडव व गावकऱ्यांनी मिळून आज सकाळी भीमसेनचा शोध घेतला.

पिंपरी लगतच्या जंगलात भीमसेन धुर्वे याचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील पांडव यांनी तात्काळ मोर्शी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. मोर्शी पोलिसांनी युद्धपातळीवर गायब झालेल्या व्यक्ती व बकऱ्यांचा शोध घेतला. तेव्हा सकाळी दहा वाजताच्या सुमारास भीमसेनचा मुलगा रामदास याला एक अज्ञात व्यक्ती काही बकऱ्या घेऊन जात असल्याचा धारूड या गावातून फोन आला. त्या दिशेने शोध घेतला असता धारूड लगतच्या जंगलात पिंपरी येथील रहिवासी असलेला साहेब लाल नामदेव भादे (वय42) हा गायब झालेल्या बकऱ्यांच्या सहित जंगलात आढळून आला. मोर्शी पोलिसांनी त्याला अटक करुन ताब्यात घेतले. भीमसेन सोबत जंगलात गेलेले त्याचे व्याही सोमाजी उईके यांचा अद्यापही शोध न लागल्याने त्यांचा शोध सुरू आहे. सर्व प्रकरणात मोर्शी पोलिसांसोबत अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे ठाणेदार किनगे व त्यांचा चमु यांची मोलाची मदत मिळाली. आरोपी साहेबलालला मोर्शी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृतकाचा मुलगा रामदास भीमसेन धुर्वे याच्या तक्रारीवरून आरोपीला अटक करून पुढील कारवाई सुरू आहे.

Intro:बकऱ्या चराईसाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाची गळा चिरुन हत्या.

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील घटना.
----------------------------------------------
अमरावती अँकर

अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील गणेशपुर-पिंपरी येथील भीमसेन अम्रुत धुर्वे (65) या वृद्ध व्यक्तीचा गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

पिंपरी येथील रहिवासी भीमसेन धुर्वे व त्यांचे व्याही सोमाजी मलजी उईके (60) हे दोघेही सकाळी पिंपरी गावालगतच्या जंगलात बुधवारी बकऱ्या घेऊन चारण्याकरिता गेले असता रात्री अंधार पडला तरीही घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला परंतु त्यांचा दोघांचाही शोध लागला नाही व बकऱ्याही दिसून आल्या नाही त्यामुळे पिंपरी येथील पोलीस पाटील धनंजय पांडव व गावकऱ्यांनी मिळून आज सकाळी भीमसेन चा शोध घेतला असता पिंपरी लगतच्या जंगलात भीमसेन धुर्वे याचे प्रेत आढळून आले पोलीस पाटील पांडव यांनी तात्काळ मोर्शी पोलीस स्टेशनला याची माहिती दिली असता मोर्शी पोलिसांनी युद्धपातळीवर गायब झालेल्या व्यक्ती व बकऱ्यांचा शोध घेतला तेव्हा सकाळी दहा वाजता चे सुमारास भीमसेन धुर्वे चा मुलगा रामदास याला एक अज्ञात व्यक्ती काही बकरा घेऊन जंगलात जात असल्याचा धारूड या गावातून फोन आला त्या दिशेने शोध घेतला असता धारूड लगतच्या जंगलात पिंपरी येथील रहिवासी असलेला साहेब लाल नामदेव भादे (42) हा गायब झालेल्या बकऱ्यांची सहित जंगलात आढळून आल्याने मोर्शी पोलिसांनी त्याला अटक करून ताब्यात घेतले भीमसेन सोबत जंगलात गेलेले त्याचे व्याही सोमाजी उईके यांचा अद्यापही शोध न लागल्याने त्यांचा शोध सुरू आहे. सर्व प्रकरणात मोर्शी पोलिसांसोबत अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे ठाणेदार किनगे व त्यांची चमु यांची मोलाची मदत मिळाली आरोपी साहेबलाल ला मोर्शी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मृतकाचा मुलगा रामदास भीमसेन धुर्वे याच्या तक्रारीवरून आरोपी अटक करून पुढील कारवाई सुरू आहे.Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.