ETV Bharat / state

भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला सुरुवात; राजनाथ सिंह, मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित

या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्यातील सर्वच भाजपचे प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.

अमरावती
author img

By

Published : Aug 1, 2019, 11:12 AM IST

Updated : Aug 1, 2019, 3:07 PM IST

अमरावती - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे महाजनादेश यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान काढण्यात येत असलेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरी येथून झाली आहे. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित आहेत.

भाजपच्या 'महाजनादेश' यात्रेला सुरुवात

या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह राज्यातील सर्वच भाजपचे प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.

असा असेल या यात्रेचा प्रवास -

विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथून १ ते ९ ऑगस्ट दरम्यान पहिला टप्पा होणार असून या भागातील एकुण १४ जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघातून १ हजार ६३९ किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार येथे होणार आहे. यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टला सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा १८ जिल्ह्यातल्या ९३ विधानसभा मतदारसंघात २ हजार ७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे. यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्ह्यांतून ४ हजार ३८४ किलोमीटर एवढ्या अंतराचा असणार आहे. दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. या दरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकुण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचेल.

Intro:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपतर्फ़े महाजनादेश यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान काढण्यात येत असलेल्या या यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज अमरावती जिल्ह्यातिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधी स्थळ असलेल्या गुरुकुंज मोझरी येथुन होणार आहे. या यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्याकरिता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सह राज्यातील सर्वच भाजपचे प्रमुख मंत्री उपस्थित राहणार आहेत.

याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्निल उमप यांनीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 1, 2019, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.