ETV Bharat / state

Look Back 2022 : सरत्या वर्षात अमरावतीत गाजलेले घात, अपघात आणि राजकीय वाद; घ्या जाणून

author img

By

Published : Dec 31, 2022, 12:06 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद, अचलपूरमध्ये दगडफेक, हनुमान चालीसा पटनावरून वाद ( Hanuman Chalisa Patna controversy ) , उमेश कोल्हे हत्याकांड ( Umesh Kolhe Murder Case ) , बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद यामुळे अमरावतीत 2022 वर्ष चांगलेच वादग्रस्त ठरले. पाहूयात सरत्या वर्षात अमरावतीत कोणत्या चांगल्या, वाईट मोठ्या घटना ( Year Ender 2022 ) घडल्या.

Look Back 2022
अमरावतीत गाजलेले घात अपघात

अमरावती : नोव्हेंबर 2021 मध्ये घडलेल्या दंगली, खुणांसह उजाडलेल्या 2022 ची सुरूवात देखील गुन्हेगारीने होत आहे. अमरावती जिल्ह्यात अपघात, उमेश कोल्हे हत्याकांड आणि हनुमान चालीसा पठणावरून झालेला राजकीय वाद असा हलकल्लोळ झाला. अनेक दुखावणाऱ्या घटनांसह काही चांगल्या स्मृती देखील सरत्या वर्षाने अमरावतीकरांना दिले आहेत.

  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद : बडनेराचे आमदार रवी राणा यांनी महापालिकेची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मध्यरात्री बसवल्याने खळबळ उडाली ( Shivaji Maharaj statue controversy ) होती. विशेष म्हणजे अनाधिकृत त्या बसवलेला हा पुतळा अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी हटविल्यामुळे आमदार रवी राणा आणि महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या वाद रंगला. आयुक्तांच्या निषेधार्थ रवी नाना यांच्या महिला कार्यकर्त्यांनी 9 फेब्रुवारीला महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर राजापेठ उड्डाणपूल परिसरात शाही फेकल्याने खळबळ उडाली होती. यानंतर या घटनेत आयुक्तांवर शाही फेकणाऱ्या तीन महिलांसह आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी पाच जणांना पोलिसांनी अटक देखील केली ( Year Ender 2022 Special ) होती.

  • मार्च महिन्यात अपघातात सहा जण ठार : अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या कसबा या गावातील कुटुंब साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी निघाले. त्यांच्या तवेरा गाडीने अंजनगाव बारी येथून आपल्या गावी परतत असताना अमरावती शहरातील रहाटगाव रिंग रोड परिसरात समोरून येणाऱ्या ट्रकवर त्यांची गाडी आदरणीय आणि ह्या अपघातात सहा जण जागीच ठार झाले ( Six People Killed In Accident ) होते. पाच जण गंभीर जखमी झाले. या अपघातात शुभम पोकळे, प्रतिभा पोकळे, विजय पोकळे, रोशन आखरे, आठ वर्षाचा चिमुकला कृष्णा गाडगे हे अंजनगाव बारी येथील रहिवासी तसेच शिरसगाव कसबा येथील गजानन दारोकार हे या अपघातात ठार झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हळहळला ( Year Ender 2022 Amravati ) होता.

  • अचलपूरमध्ये दगडफेक : जिल्ह्यातील अचलपूर शहरात असणाऱ्या दुधा गेटवर 17 एप्रिल च्या रात्री भगवा झेंडा फडकविल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण होऊन रात्री दहा वाजेच्या सुमारास दोन गट आमने सामने उभे ठाकले आणि यावेळी प्रचंड दगडफेक झाली ( Stone Threw in Achalpur ) होती. पोलिसांनी त्याच रात्री साडेअकरा वाजता कलम 144 अंतर्गत संचार बंदी घोषित केली. अचलपूर मध्ये जिल्ह्यातील विविध भागातून पोलीस कुमक तैण्यात करण्यात आली होती. अचलपूरच्या घटनेनंतर सलग पंधरा दिवस राजकीय वाद उफाळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला अटक केली होती तर या प्रकरणासाठी त्यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या यशोमती ठाकूर ह्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे डॉक्टर अनिल बोंडे यांनी केला होता.

  • हनुमान चालीसा पटनावरून प्रचंड वाद : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेरा चे आमदार रवी राणा यांनी प्रत्येक मंदिरावर हनुमान चालीसा पठण व्हावे यासाठी जिल्ह्यातील अनेक मंदिरांना लाऊड स्पीकर वितरित केले ( Hanuman Chalisa Patna controversy ) होते. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठण करावे असे आव्हान दिले होते. या संपूर्ण प्रकारामुळे अमरावती शहर आणि जिल्हा हादरून गेला होता. शिवसैनिकांनी राणा दाम्पत्या विरोधात अमरावतीत तीव्र आंदोलन छेडले होते. मात्र शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दांपत्य 21 एप्रिल च्या रात्रीच नागपूर मार्गे मुंबईला रवाना झाले होते. 23 एप्रिल ला राणादांपत्य मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पटनासाठी आग्रह करीत असताना इकडे अमरावती शहरात त्यांच्या शंकर नगर या निवासस्थानासमोर शिवसैनिकांनी मोठा मोर्चा काढला यावेळी राणा यांच्या घरावर दगडफेकही झाली होती.

  • उमेश कोल्हे हत्याकांडाने हादरली शहर : अमरावती शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे यांची 21 जूनच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास गळा चिरून हत्या करण्यात आली ( Umesh Kolhe Murder Case ) होती. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाल्याने अमरावती शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. हे प्रकरण देश पातळीवर गाजले. 'एनआयए 'ने या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणात पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे. सुरुवातीला हे प्रकरण पैशांच्या देण्याघेण्यावरून झाल्याचे अमरावती पोलिसांनी स्पष्ट केले होते मात्र एन आय ए च्या तपासानंतर अमरावती पोलिसांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्यामुळेच उमेश कोल्हे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे महिनाभरापर्यंत अमरावती शहरात उमेश कोल्हे यांच्या हत्तेचा विषय ज्वलंत होता. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्यासह भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी उमेश कोल्हे हत्याकांड्याचा निषेधार्थ अमरावती शहरात श्रद्धांजली सभा आणि मोर्चाचे आयोजन केले होते.

  • मेळघाटात दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू : मेळघाटातील समस्या अनेक वर्षांपासून कायम आहेत. यावर्षी जुलै महिन्यात मेळघाटातील पाचडोंगरी आणि कोयलारी या गावात विहिरीतील दूषित पाणी पिल्याने पन्नास जणांना अतिसाराची लागण झाली ( Three died drinking contaminated water Melghat ) होती. या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकारामुळे मेळघाटात आदिवासींना साधे पाणी देखील पिण्यासाठी उपलब्ध नाही असा विषय ऐरणीवर आला होता. दूषित पाणी पिल्याने दगावलेल्या तीन जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

  • राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा विश्वविक्रम : राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा विश्वविक्रम अमरावतीत झाला. अकोला दरम्यान लोणीपासून समोर 37.5 किलोमीटर अंतरापर्यंतच्या रस्त्याचे सलग 3 जून ते 7 जून पर्यंत अविरत काम करून रस्ता निर्मितीचा विश्वविक्रम नोंदविला ( National Highway Construction World Record ) गेला. राजपथ इन्फ्राकोन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नॅशनल हायवे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने सलग चार दिवस रस्ता निर्मितीचे केलेले काम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविले गेले.

  • शिवाजी शिक्षण संस्थेत हर्षवर्धन देशमुखांचा विजय : महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि विदर्भातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असणाऱ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची सप्टेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचे प्रगती पॅनल निवडून आले. आणि हर्षवर्धन देशमुख सलग दुसऱ्यांदा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झालेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या 774 पैकी 672 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले होते. हर्षवर्धन देशमुख यांनी नरेशचंद्र ठाकरे यांचा 127 मतांनी पराभव केला होता.

  • बच्चू कडू आणि रवी राणांच्यातला वाद : अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडणाऱ्याचे आमदार रवी राणा या दोघांचेही शिंदे फडणवीस सरकारला समर्थन आहे. मात्र आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी दोघांच्याही सुरू असलेल्या चढाओढीतून त्यांच्यात वाद उफाळून आला ( Bachu Kadu and Ravi Rana controversy ) होता. अद्याप दोघांनाही मंत्रिमंडळात कुठलेही स्थान मिळाले नसले तरी नोव्हेंबर महिन्यात एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी दोन्ही आमदारांनी एकमेकांवर तीव्र आरोप प्रत्यारोप केलेत. या दोघांमध्ये विकोपाला गेलेला वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे संपुष्टात आला.

  • स्कायवॉक अधांतरीच, विमानही जमिनीवर : अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे होणारा जगातील सर्वाधिक ४०७ मीटर लांबीचा स्कायवाक प्रकल्प यावर्षी देखील रखडला गेला. या प्रकल्पाचे 72 टक्के काम पूर्ण झाले असून नॅशनल वाईल्ड लाईफ बोर्डने अक्षय घेतल्यामुळे 2021 पासून हे काम थांबले. या संपूर्ण वर्षभरात या कामाचा फॉलोअप राजकीय नेत्यांकडून विशेष असा घेतला गेला. नसल्यामुळे हा प्रकल्प अद्यापही रखडला आहे. स्कायवॉक प्रमाणेच अमरावती विमानतळाचा प्रश्न देखील यावर्षी मार्गी निघू शकला नाही. गत दहा वर्षांपासून अमरावतीकरांना अमरावतीतून विमान आकाशात झेपावेल असे स्वप्न दाखविले जात आहे. जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी 13 नोव्हेंबर 2019 रोजी अमरावती विमानतळाची पाहणी केली असता त्यावेळी 872 मीटर लांबीच्या धावपट्टीचे काम जोमात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते. आणि 2020 च्या ऑगस्ट महिन्यात विमान मुंबईसाठी झेप घेईल असे सुद्धा सांगितले होते मात्र 2021 मध्ये देखील अमरावती विमानतळाचे काम रखडलेच असल्यामुळे आता आणखी वर्षभरानंतर नक्कीच विमान झेप घेईल असे आश्वासन राजकीय नेत्यांकडून दिल्या गेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.