ETV Bharat / state

Little Green Bee Eater : उन्हाळ्यात आला निळ्या शेपटीचा पाहुणा; जाणून घ्या कसा आहे मनाला वेड लावणारा वेडा राघू पक्षी - जंगलातील कीटकांना आपले भक्ष्य बनवतो

उन्हाळ्यात पानवठ्यावर वेडा राघू पक्षी सगळ्यांना वेड लावत असल्याचे दिसून येते. वेडा राघू हा पक्षी दोन महिने अमरावतीच्या जंगलात पाहुणा येतो. दिसायला देखणा असलेला हा वेडा राघू जंगलातील कीटकांना आपले भक्ष्य बनवतो.

Little Green Bee Eater
वेडा राघू
author img

By

Published : May 11, 2023, 6:56 PM IST

अमरावती : सध्या जंगलात सगळीकडे पानगळ झाल्यामुळे माळरान ओसाड झाले आहे. या ओसाड माळारानातील पानवठ्यावर निळ्या रंगाचा सुंदर असा पक्षी आढळून येतो आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यात जिल्ह्यात पाहुणा म्हणून हा पक्षी येत असल्याची माहिती वन्यजीव प्रेमी देतात. दोन महिन्यासाठी अमरावतीच्या जंगलात पाहुणा म्हणून येणाऱ्या या पक्षाचे नाव वेडा राघू असे आहे. सध्या वेडा राघू या पक्षाने जंगलातील सगळ्यांना वेड लावल्याचेच दिसून येत आहे.

घनदाट जंगलात मनाला वेड लावणाऱ्या वेडा राघू पक्षाची माहिती

काय आहे वेडा राघू पक्षाचे वैशिष्ट्य : झाडाच्या फांद्यांवर, एखाद्या भिंतीवर आणि विजांच्या तारावर बसून सहज उडणारे कीटक हवेतच बसून पकडण्याची कला वेडा राघूमध्ये आहे. वेडा राघू हा पक्षी चिमणीच्या आकाराचा आहे. मात्र या पक्षाची शेपटी ही लांब आणि आकर्षक असते. हा पक्षी हवेत उडणारे कीटक आणि मधमाश्या खातो. यामुळे इंग्रजीमध्ये त्याला लिटिल ग्रीन बीटर अर्थात मधमाशा खाणारा लहान हिरवा पक्षी असे म्हणतात. या पक्षाच्या डोक्यावर आणि मानेवर सोनेरी आणि तपकिरी रंगाचे मिश्रण तर चोचीखाली निळा रंग असतो. या पक्षाच्या गळ्यावर आडवा काळ्या रंगाचा बारीक पट्टा असतो. या पक्षाच्या डोळ्याजवळही काळा पट्टा असतो. या पक्षाचे डोळे लालसर असून पक्षाची चोच ही काहीशी बाकदार आहे. शरीराच्या मानाने या पक्षाची चोच लांब वाटते आणि शेपूट सुद्धा लांब असते.

कोणता असतो वेडा राघूचा विणीचा काळ : मार्च आणि एप्रिल हा वेडा राघू पक्षाच्या विणीचा काळ असून या काळात तो विशेष प्रकारचे घरटे तयार करतो. या घरट्यांमध्ये मादी एकाच वेळेस पांढऱ्या रंगाची तीन ते पाच अंडी घालते. अंडी उबवणे आणि पिल्लांचा सांभाळ करणे ही दोन्ही कामे नर आणि मादी मिळून करतात. हे पक्षी समूहाने रहात असून या पक्षांचे थवे अनेकदा एखाद्या झाडावर पानवठ्यावर तर कधी मानवी वस्तीत देखील आढळून येतात.

अमरावती जिल्ह्यात 295 च्यावर पक्षी : अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून येतात. जिल्ह्यात 295 च्यावर पक्ष्यांची नोंद झाल्याची माहिती पक्षी निरीक्षक यादव तरटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. वेडा राघू हा पक्षी एप्रिल आणि मे महिन्यात जिल्ह्यात येतो. दरवर्षी सुमारे 100 च्या संख्येत हे पक्षी जिल्ह्यात येतात. हे पक्षी समूहाने स्थलांतरण करतात. समूहानेच हे पक्षी आपले घरटे तयार करतात. वेडा राघू पक्षी कीटक नियंत्रण करण्याचे काम करतात. वेडा राघू हा कीटक भक्षक पक्षी आहे. त्यामुळे जैवविविधतेमध्ये वेडा राघू या पक्षाचे अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. वेडा राघूचे अमरावती जिल्ह्यातील आगमन हे जिल्ह्यातील पक्षी वैभवात अतिशय महत्त्वाचे मानले जाते, असे देखील यादव तरटे यांनी यावेळी सांगितले.

वन्यजीव छायाचित्रकारांसाठी पर्वणी : अमरावती शहरातील छत्री तलाव, वडाळी तलावाचा परिसर, फुटका तलाव, राजुरा तलाव, विद्यापीठ तलाव, मालखेड तलाव या परिसरात वेडा राघू सध्या आढळून येत आहे. जंगलामध्ये विविध पक्षी आपल्या कॅमेरात टिपणाऱ्या वन्यजीव छायाचित्रकारांसाठी वेडा राघूला आपल्या कॅमेरात टिपण्याची अतिशय सुंदर संधी प्राप्त झाल्याचे वन्यजीव छायाचित्रकार अमित सोनटक्के 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.

हेही वाचा -

1) Maharashtra Political Crisis : सत्ता की पुन्हा संघर्ष आज होणार फैसला, राज्यपालांची कृती ठरणार घटनाबाह्य; जाणून घ्या काय म्हणाले घटनातज्ज्ञ

2) Gas leak in Nangal : लुधियानानंतर आता नांगलमध्ये गॅस गळतीने हाहाकार, लहान मुलांसह अनेकांना उलट्यांचा त्रास

3) Former Pakistan Minister Arrested : इमरान खान पाठोपाठ पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशीही अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.