ETV Bharat / state

रणधुमाळी लोकसभेची : अमरावतीत दारूचा महापूर, ड्राय-डे न ठेवण्याचीही मागणी

बूथवर दिवसभर बसणारे, रॅली काढण्यासाठी गर्दी जमविणारे, पत्रक वाटणारे यांच्यासाठी रात्री घरी जाताना दारूची सोय लावणे हे जणू उमेदवाराचे आद्य कर्तव्य ठरत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू पिण्याचा आणि पाजण्याच्या मैफिली चांगल्याच रंगात आल्या आहेत.

author img

By

Published : Apr 12, 2019, 12:19 PM IST

पोलीस ठाण्या अंतर्गत विविध ठिकाणी नाका बंदी करून कारवाई केली जात आहे.

अमरावती - निवडणुकीचा काळ म्हणजे दारू पिणाऱ्यांसाठी सुवर्ण काळच. त्यातही देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तर दारूला महापूर येतो. अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारू पिण्याचा आणि पाजण्याच्या मैफिली चांगल्याच रंगात आल्या आहेत.

कारवाईची माहिती देताना पोलीस अधिकारी

आधी टोकन मग बाटली

अमरावती लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या २४ पैकी चार पाच उमेदवार सोडले तर कोणाचा नाव पत्ताही मतदारांना ठाऊक नाही. असे असले तरी निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची सोय मात्र लावली जात आहे. बूथवर दिवसभर बसणारे, रॅली काढण्यासाठी गर्दी जमविणारे, पत्रक वाटणारे यांच्यासाठी रात्री घरी जाताना दारूची सोय लावणे हे तर जणू उमेदवाराचे आद्य कर्तव्य ठरत आहे. कार्यकर्त्यांच्या हातात थेट दारूची बाटली न ठेवता त्याला एक टोकन दिले जाते. हे टोकन ठरलेल्या दारू विक्रेत्याकडे दिल्यावर बरोबर एक बाटली कार्यकर्त्याला मिळते. अशी व्यवस्था झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांसाठी आहे. सुशिक्षत कार्यकर्त्यांना थोडी वरच्या दर्जाची ट्रीटमेंट दिली जात आहे. अशा कार्यकर्त्यांसाठी ठरलेल्या बारचे टोकन दिले जाते. आता राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दारू विक्री बंद असली तरी यापूर्वीच दारूचा स्टॉक केला जात आहे.

'मोहाच्या' दारूचा सुळसुळाट

मतदार संघातील अमरावती, अचलपूर, तिवसा, बडनेरा, दर्यापूर, या विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणि मतदारांना पैसा आणि दारूची अवैध मार्गाने पोहच केली जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व दहाही पोलीस ठाण्या अंतर्गत विविध ठिकाणी नाका बंदी करून कारवाई केली जात आहे. येणाऱ्या काळात धाडसत्रही राबविले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी दिली. अमरावतीसह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पोलीस पैसे आणि दारू साठ्यावर नजर ठेवून आहेत. मेळघाट मतदारसंघात येणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात त्याच भागात मिळणाऱ्या मोहाच्या दारूचा सुळसुळाट आहे. ही दारू शहरी भागात अवैध मार्गाने आणण्याचा प्रतापही काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे.

दारूची अवैध विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई

देशी, विदेशी, बियर आणि वाईनच्या विक्रीत २०१८ च्या मार्च महिन्याच्या तुलनेत २०१९ च्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान निवडणुकीच्या या काळात दारूची अवैध विक्री करण्याच्या प्रकारात ११५ गुन्हे दाखल झाले असून ८४ जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हाभरातील एकूण १८७५ हातभट्टींवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत आजवर २३ हजार ३७६ लिटर दारू जप्त करण्यात आली तर २६३ लिटर अवैध देशी दारू, ६७ लिटर ताडी, चार वाहने असा ८ लाख ४० हजार ८६६ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

निवडणुकीच्या काळात 'ड्राय डे' ठेवणे चुकीचे - बार मालक

अमरावतीत दोन बारचे मालक असणारे नितीन मोहोड यांनी निवडणुकीच्या काळात सलग चार दिवस 'ड्राय डे' ठेवणे हा चुकीचा प्रकार असल्याचे सांगितले. या ड्राय डेच्या दिवशी सर्व दारूच्या दुकानांसमोर गर्दी उसळते. चार पाच दिवसांची दारू आधीच साठवून ठेवली जाते. शासनाला निवडणूक काळात दारूबंदी करायची असेल तर त्यांनी ड्राय डेच्या पाहिल्या दिवशी प्रत्येक दारू दुकानात केवळ परवानाधारकांनाच दारूची विक्री होईल, याची काळजी घ्यावी. खरं तर ड्राय डेला दारूचा प्रचंड साठा केला जातो आणि मतदानासाठी चक्क दारू पिलेल्यांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर चक्क उचलून नेण्यात येत असल्याचे चित्रही दिसते, असे मोहोड म्हणतात.

एकूण दारुशिवाय निवडणूक नाही असेच चित्र याही निवडणुकीत अमरावती मतदार संघात पाहायला मिळते आहे. या दारूचा मतदानावर नेमका कसा असर होतो हे मतदानाच्या आणि मत मोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Intro:निवडणुकीचा मोसम म्हणजे दारू पिणाऱ्यांसाठी सुवर्ण काळ. त्यातही देशातील सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत तर दारूला महापूर येतो. अमरावती लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिमग्यापासून चढलेला निवडणुकीचा ज्वर आणि दारू पिण्याचा, पाजण्याच्या मैफिली चांगल्याच रंगात आल्या आहेत.

Body:अमरावती लोकसभा मतदार संघात 24 उमेद्वार निवडणूक रिंगणात आहेत. या 24 पैकी चार पाच उमेदवार सोडले तर कोणाचा नाव पत्ताही मतदारांना ठाऊक नाही. असे असले तरी निवडणूकीच्या मैदानात उतरलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची सोय मात्र केली लावली जात आहे. बूथवर दिवसभर बसणारे, रॅली काढण्यासाठी गर्दी जमविणारे, पत्रक वाटणारे यांच्यासाठी रात्री घरी जाताना दारूची सोया लावणे ही तर जणू उमेदवाराचे आद्य कर्तव्य ठरते आहे. आशा कार्यकर्त्याच्या हातात थेट दारूची बाटली न ठेवत त्याला एक टोकन दिले जाते. हे टोकन ठरलेल्या दारू विक्रेत्याकडे मेउन दिल्यावर बरोबर एक बाटली आशा कार्यकर्त्याला मिळते. अशी व्यवस्था झोपडपट्टीतल्या कार्यकर्त्यांसाठी असताना सुशिक्षत कार्यकर्तना थोडी वरच्या दर्जाची ट्रीटमेंट दिली जात आहे. अशांसाठी ठरलेल्या बारचे टोकन दिले जाते. काल पर्वापर्यंत ही सिस्टम अशी लागली असताना आता राम नवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला दारू विक्री बंद असली तरी यापूर्वीच दारूचा स्टॉक केला जातो आहे.
मतदार संघातील अमरावती, अचलपूर, तिवसा, बडनेरा, दर्यापूर, या विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात कार्यकर्ते आणि मतदारांना पैसा आणि दारू अवैध मार्गाने पोचती केल्या जात असल्याचा दाट संशय असल्याने पोलीस प्रशासनाने अमरावती शहराच्या सर्व दिशेला तपासणी नाके सज्ज ठेवले आहेत. या नाक्यावर तैनात पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची कसून झडती घेतली जात आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व दहाही पोलीस स्टेशन अंतर्गत विवधी ठिकाणी नाका नंदी करून कारवाई केली जात आहे. येणाऱ्या काळात धाडसत्रही राबविलेल्या करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
अमरावतीसह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी पोलीस पैसे आणि दारू साठ्यावर नजर ठेवून आहेत. मेळघाट मतदार संघात येणाऱ्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यात त्याच भागात मिळणाऱ्या मोहयाच्या दारूचा सुळसुळाट आहे. ही दारू शहरी भागात अवैध मार्गाने आणण्याचा प्रतापही काही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे.
देशी, विदेशी, बियर आणि वाईनच्या विक्रीत 2018 च्या मार्च महिन्याच्या तुलनेत 2019 च्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. गत वर्षी मार्च महिन्यात देशी दारूची जिल्ह्यात 11 लाख 74 हजार 310 लिटर विक्री झाली होती. यावर्षी मार्च महिन्यात 14 लाख 23 हजार 738 लिटर दारूची विक्री ,आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले असून ही विक्री गत वर्षीच्या तुलनेत 21.24 वाढली आहे. विदेशी दारूचा 2018 च्या मार्च महिन्यात 26 हजार 729 लिटर खप झाला यावर्षी मार्च महिन्यात 32 हजार 119 लिटर दारूची विक्री झाली असून गत मार्च महिन्याच्या तुलनेत विदेशी दारूच्या विक्रीही 59 हजार 390 लिटर अधिक झाली आहे. बिअरची विक्री मार्च 2018 मध्ये 2 लाख 58 हजार 931 लिटर झाली होती. यावर्षी मार्च महिन्यात 3 लाख 532 लिटर बिअर विक्री झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 41 हजार 601 लिटरने बिअरचा खप वाढला आहे. 2018च्या मार्च महिन्यात झालेल्या वाईनच्या खपात आणि 2019 च्या वाईन विक्रीत 117 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. गत मार्च महिन्यात 1 हजार 367 लिटर वाईन ची विक्री झाली होती आता लोकसभा निवडणुक जाहीर झालेल्या मार्च महिन्यात 2979 लिटर वाईंची विक्री अमरावती जिल्ह्यात झाली आहे.
दरम्यान निवडणुकीच्या या मोसमात दारूची अवैध विक्री करण्याच्या प्रकारात 115 गुन्हे दाखल झाले असून 84 जणांना अटक करण्यात आली आहे. जिल्हाभरातील एकूण 1875 हटभट्टीवर कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत आजजवर 23 हजार 376 लिटर दारू जप्त करण्यात आली तर 263 लिटर अवैध देशी दारू, 67 लितर ताडी चार वाहने असा 8 लाख 40 हजार 866 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
एकूण निवडणुकीच्या काळात दारूला उधाण आले असताना अमरावतीत दोन बारचे मालक असणारे नितीन मोहोड यांनी निवडणुकीच्या काळात आता सलग चार दिवस 'ड्राय डे ' ठेवणे हा चुकीचा प्रकार आह असे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. या ड्राय डेच्या दिवशी सर्व दारूच्या दुकानासमोर गर्दी उसळते. चार पाच दिवसांची दारू आधीच साठवून ठेवली जाते. शासनाला खरोखर निवडणूक काळात दारूबंदी करायची असेल तर त्यांनी ड्राय डे च्या पाहिल्यादिवशी प्रत्येक दारू दुकानात केवळ पर्वानाधारकानाच दारूची विक्री होईल याची काळजी घेतली जावी. खरं तर ड्राय डे ला दारूचा प्रचंड साठा केला जातो आणि मतदानासाठी चक्क दारू पिलेल्याना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर चक्क उचलून नेण्यात येत असल्याचे चित्रही दिसते असे मोहोड म्हणतात.
एकूण दारुशिवाय निवडणूक नाही असेच चित्र याही निवडणुकीत अमरावती मतदार संघात पाहायला मिळते आहे. या दारूचा मतदानावर नेमका कसा असर होतो हे मतदानाच्या आणि मत मोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.