अमरावती : Leopard killed in Amravati संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मागच्या बाजूला रविवारी सकाळी एक बिबट्या मुर्दावस्थेत आढळून आल्यावर या भागात परिसरातील लोकांची सकाळीच गर्दी उसळली. बिबट्याच्या मृत्यूची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. वनविभागाच्या पथकाने पंचनामा करून मृत बिबट्याला सविच्छेदनासाठी वडाळी येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात आणले.
विद्यापीठ आणि तपोवन परिसरात नेहमीच दिसतो बिबट्या : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि लगतच्या तपोवन परिसरात गत सहा महिन्यांपासून नेहमीच वेगवेगळ्या भागात बिबट्या दिसतो आहे. या भागात पाच ते सहा बिबट्या असल्याची माहिती आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात रोजच बिबट्या आढळत असून तपोवन परिसरात देखील अनेकांच्या घराबाहेर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बिबट्या हालचाली कैद झालेल्या रोजच दिसून येतात. दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरामागे आढळून आलेला बिबट्या हा दोन बिबट्यांच्या झुंजीत ठार झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
विधिमंडळात गाजला होता मुद्दा : नियमी परिसरात गत दोन महिन्यांपासून असणारा हा बिबट्या त्याआधी लगतच्या विलास नगर परिसरात मणिपूर लेआउट परिसरातील झुडपांमध्ये लपला होता. हॅपी बर्थडे परिसरातील कुत्र्यांना खाऊन झुडपांमध्ये आणि परिसरातील नाल्यामध्ये दडून राहायचा. तीन महिन्यापूर्वी हा बिबट्या नागरी वसाहतीमध्ये आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. वनविभागाने सलग चार दिवस त्याला विलासनगर परिसरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर हा बिबट्या नियमी परिसरातील झुडपात दडून बसला होता. दरम्यान अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी बिबट मुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचा मुद्दा विधिमंडळात रेटून धरला होता.
गुरुवारी मिळाले आदेश : नियमी परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासंदर्भात राज्याचे प्रधान मुख्य मना संरक्षक महीप गुप्ता यांनी दिलेल्या आदेशानुसार अमरावतीचे उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांनी गुरुवारी नियमी परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यासंदर्भात पत्र दिले होते. या पत्रानुसार नियमित परिसरात शिकार प्रतिबंधक पथकाने सापळा रचला. सलग दोन दिवस ह्या बिबट्यावर लक्ष ठेवण्यात आले आणि शनिवारी सायंकाळी एका झुडपात दडून बसलेल्या या बिबट्याला पकडण्यात आले.
बिबट्याची होणार वैद्यकीय तपासणी : नियमी परिसरातील या बिबट्याला शनिवारी सायंकाळी जेलबंद केल्यावर वडाळी येथील वन्य प्राणी कक्षात आणले आहे. पशु वैद्यकीय छमूकडून या बिबट्याची आरोग्य तपासणी केली जाणार असून त्यानंतर या बिबट्याला नेमके कोणत्या जंगल परिसरात सोडायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वडाळी वनस्पतीच्या अधिकारी वर्षा हरणे यांनी दिली.
हेही वाचा :