अमरावती - अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शंभर उंबरठ्याच रघुनाथ पूर हे छोटसे गाव आहे. या गावात पाणी टंचाई नित्याची झाली होती. त्यामुळे पाणीपुरवठा हा नियमित होत नव्हता. कधी जमिनीखाली असलेली पाण्याची पाईप लाईन ब्लॉक व्हायची, तर कधी लिकेज, तर कधी कुणाला नवीन नळजोडनी द्यायची झाली, तरी रस्ता फोडवा लागायचा. त्यामुळेही अनेकदा पाणीपुरवठा बंद राहायचा. या कारणाने गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत होती. त्यामुळे गावात पुन्हा नवीन नळाची पाईपलाईन टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. पण या गावात टाकण्यात आलेली पाईपलाईन आता चर्चेचा विषय ठरु लागली आहे. स्थानिक जिल्हा परिषदेच्या सदस्य गौरी देशमुख यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून आठ लाख रुपये खर्च करून या गावात नवीन पाईप लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, यासाठी गावांतील कुठलाही रस्ता फोडला नाही, तर कुठे नाल्याही खोदाव्या लागल्या नाही. तर या छोट्याशा गावात टाकलेली पाण्याची पाईपलाईन ही जमीनीखालून नाही तर चक्क जमिनीवर लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्यामुळे गावांतील रस्त्याचे नुकसान झाले नसून कमीत कमी पैशात ही योजना राबवली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रघुनाथपूर हे पहिले गाव ठरले असून रघुनाथपूर पॅटर्नची चर्चा रंगू लागली आहे.
प्रत्येकाच्या घरी योजनेचा नळ -
प्रत्येकाच्या घरी पाणीपुरवठा योजनेचा नळ आहे. आपल्या घरी नळाद्वारे येणारे पाणी हे जमिनीत खोलवर टाकलेल्या पाईपलाईन मधून येत असते. अनेकदा ही पाईपलाईन फुटणे, ब्लॉक होणे यामुळे पाणीपुरवठा हा खंडित होत असतो. प्रत्येक गावात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन ही जमिनीतच पुरलेली असते, पण आता अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर याला अपवाद ठरले आहे. केवळ ५०० लोकसंख्या असलेल्या रघुनाथपूर या गावाला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने जिल्हा परिषद सदस्य गौरी देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी कमी लोकसंख्या असलेल्या गावात जमिनीवरून जर नळाची लोखंडी पाईपलाईन टाकली. तर गावात सुरळीत कायमस्वरूपी पाणी पुरवठा होऊन गावातील पाणी प्रश्नांपासून मुक्तता मिळू शकते. याबाबतची या नव्या प्रयोगाची संकल्पना जिल्हा परिषदेच्या एका सभेत मांडली होती. त्यासाठी तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर हे गाव समोर ठेवले होते. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या कामाला जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी आठ लाख रुपये मंजूर केले. त्यामुळे कमी कालावधीत हे काम पूर्ण करण्यात आले.
नळ दुरुस्तीच्या कामांमध्ये होणार मोठी घट -
आता या गावात लोखंडी पाईपलाईन ही जमिनीच्या वर रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली आहे. त्यामुळे या गावकऱ्यांची पाण्याची चिंता तर मिटली. सोबतच ग्रामपंचायतला नेहमी लागणारा नळ दुरुस्तीचा खर्चही आता कमी झाला आहे. दरम्यान, अशाप्रकारे पाईपलाईन टाकून गावाला पाणीपुरवठा करणारा रघुनाथपूर हे राज्यातील पहिले एकमेव गाव ठरले आहे.
८० पेक्षा जास्त घरी नळजोडनी -
रघुनाथपूर या गावात टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईनने प्रत्येक घरी नळ कनेक्शन देण्यात आले आहे. जवळपास शंभर घरी नळ कनेक्शन देण्यात आले असून याला पाच व्हॉल लावण्यात आले आहे. वेळेनुसार गावाच्या प्रत्येक भागात पाणीपुरवठा केला जातो.
नळातून येणाऱ्या पाण्याचा फोर्स वाढला -
पूर्वी या गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन ही जमिनीच्या आत होती. परंतु आता सात लाख रुपये खर्च करून नव्याने टाकण्यात आलेली पाईप लाईन ही जमिनीवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या घरी सहज पाणी पोहोचत असून आधीपेक्षा आता पाण्याला फोर्स वाढला असल्याचा येथील ग्रामस्थांनी सांगितले.
हेही वाचा- साकीनाका घटनेतील पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत करणार- यशोमती ठाकूर