अमरावती : निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या अंदमान निकोबार बेटावर 2004 च्या त्सुनामीमुळे प्रचंड हानी झाली. संकटानंतर षन्मुखने मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर थेट चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून तो काम करू लागला. निसर्गातून थेट मायानगरीतील सिमेंटच्या जंगलात षन्मुखची भेट संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्याशी झाली. विजय भटकर यांचे विचार त्याच्या मनात खोलवर रुजले. तो या विचारांनी प्रभावित होऊन वृक्ष प्रेमाकडे आकर्षित झाला. त्याने चक्क वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली. तुला जिल्ह्यात त्याने जिल्हा परिषद तसेच इतर शासकीय विभागाशी संपर्क साधून वृक्षरोपण मोहीम राबवण्यास पुढाकार घेतला.
वृक्ष लागवड योजना खऱ्या अर्थाने यशस्वी करायची असेल, तर त्या क्षणासोबत व्यक्तींची भावनिक गुंतवणूक असणे गरजेचे- षन्मुख नाथन
वृक्षांसोबत हवी भावनिक गुंतवणूक : मी शासनाच्या प्रत्येक विभागाशी संपर्क साधत आहे. अमरावती देखील विभागीय आयुक्तांना भेटण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण भारतात एकूण 407 लाख हेक्टर निरुपयोगी जागा आहे. या जागेत विविध देशी वृक्षांची रोपटे मला लावायची आहे. कोरोना काळात पिण्यासाठी अनेकांनी लाखो रुपये खर्च केले. जन झाडे लावल्याने मोफत उपलब्ध आहे. झाडे लावणे अत्यंत गरजेचे आहे. आई आपल्या बाळाला केवळ नऊ महिने पोटात वाढवते. मात्र, वृक्ष त्या बाळाला जन्मापासून मृत्यूपर्यंत ऑक्सिजन पुरवून जपतो. यामुळेच वृक्ष ही आपली दुसरी आई आहे, याची जाणीव ठेवून प्रत्येक व्यक्तीने आपल्या हयातीत किमान 22 वृक्ष लावावे असे षन्मुख नाथन म्हणतो.
वृक्ष लागवडीचे स्वस्तिक पॅटर्न : षन्मुख नाथन याने वृक्ष लागवडीसाठी स्वस्तिक पॅटर्न आणला आहे. या स्वस्तिक पॅटर्नमध्ये 100 बाय 100 फूट जागेत 1000 रोपट्यांची लागवड स्वस्तिकच्या आकारात केली जाते. यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावता येतात. यामध्ये गोंधळ, सीताफळ, पिंपळ, बाभूळ, बेल, वड, अर्जुन, जांब, आवळा यासारखी देशी फळे व फुले तसेच औषधी गुणधर्मयुक्त वृक्षांचा समावेश असतो. स्वस्तिक आकाराने उर्वरित जागेत इतर कामे करता येतात. त्यामुळे अशा स्वस्तिक पॅटर्नप्रमाणे सर्वत्र वृक्ष लागवड अतिशय फायदेशीर असल्याचे षन्मुख नाथन म्हणाले.
लोकांचा विश्वासासह वाढला सहभाग : आपली जन्मभूमी सोडून अगदी आगळावेगळ्या भागात वृक्ष लागवडीचा संदेश देण्यासह झपाटल्याप्रमाणे वृक्ष लागवड करायला लागलो. तेव्हा अनेक जण माझी मजा घ्यायची. मला वेड्यात काढले गेले. काही जणांनी केवळ पैसा कमवायच्या उद्देशाने फालतूपणा चालवला असल्याचा आरोप केला. मात्र हळूहळू माझे काम हे निस्वार्थ असल्याची जाणीव लोकांना होत गेली. लोकांचा माझ्यावर विश्वास बसायला लागला. आता अनेकजण मला जेवणाचा डबा पाठवतात. वृक्ष लागवडीसाठी काहीजण पैसेही देत आहेत, तर मला कपडे देखील लोकांकडूनच मिळायला लागले असल्याचे षन्मुख याने सांगितले.
विद्यार्थ्याने लावावे एक वृक्ष : वृक्ष लागवड चळवळ ही खऱ्या अर्थाने शाळेतून यशस्वी होऊ शकते. प्रत्येक विद्यार्थ्याने वृक्ष लागवडीचा संकल्प करून किमान एकदा प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या सोयीच्या ठिकाणी एक झाड लावायला हवे. शाळांमध्ये एक विद्यार्थी एक झाड, मध्ये एक जन्म एक झाड. टाकला एक झाड असे नवनवे उपक्रम आखून वृक्ष लागवड चळवळ सहज यशस्वी करता येईल. झाडांना त्यांची नावे द्यायला हवी, आपला वाढदिवस विद्यार्थ्यांनी झाडांसोबत साजरा करण्याची प्रथा सुरू व्हायला हवी. झाड सुकले तर दुसरे झाड लावण्याची प्रेरणा समाजात रुजावी, असे षन्मुख नाथन याचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र आणि उत्तरांचल सरकारने घेतली दखल : वृक्ष लागवडीसाठी झपाटलेल्या षन्मुख याच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र आणि उत्तरांचल सरकारने प्रत्येक शासकीय कार्यालय शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तर ती 'एक झाड एक व्यक्ती एक झाड' ही मोहीम राबविण्याबाबत आदेशच पारित केला आहे. वसुंधरा हिरवीगार व्हावी, हाच माझा उद्देश आहे. प्रत्येकाने झाडे लावण्याचा, झाड जगवण्याचा संकल्प घ्यावा, असे षन्मुख नाथन म्हणतो.
हेही वाचा :