अमरावती - कर्नाटकात हिजाबवरून पेटलेल्या ( Karnataka Hijab Row ) वादाच्या निषेधार्थ आज अमरावतीत ( hijab controversy in amravati ) हिजाब परिधान करून अनेक युवती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. हिजाबचे राजकारण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी या युवतींनी जिल्हाधिकारी पौनित कौर यांच्याकडे केली आहे.
शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त -
मुस्लिम संघटनांनी आज हिजाब प्रकरणात मोर्चा काढण्याचा इशारा दिल्याने शहरातील सर्व मुख्य चौकात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पठाण चौक, शनि मंदिर, इतवारा बाजार, चित्रा चौक, कॉटन मार्केट, जयस्तंभ चौक, इर्विन चौक, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांचे संपर्क कार्यालय, गर्ल हायस्कूल चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
12 नोव्हेंबर रोजी निघालेल्या मोर्चा दरम्यान तणाव निर्माण होऊन दंगल उसळली होती. यामुळे आज पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला असून राज्य राखिव पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. आम्ही वाघिणी घाबरणार नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही आमच्या धर्माचे अनुकरण करतो. याचा कोणालाही काहीच नाही. मात्र, आता देशात विविध ठिकाणी निवडणूक असल्यामुळे या विषयावरून राजकारण केले जात असल्याचे शबानम सलाउद्दीन खान या युवतीने पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. आमच्यावर विनाकारण अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही वाघिणी कोणालाही घाबरणार नाही, असा इशाराही या युवतीने दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन -
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाने मुस्लिम युवतींनी जिल्हाधिकारी पौणीत कौर यांना निवेदन सादर केले. ही जागा भरून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा, अशी मागणी मुस्लिम युवतींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
हेही वाचा - Bachchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा