ETV Bharat / state

रुजू होण्याचा पत्ता नाही; नियुक्तीचा आनंदही वीरला: नायब तहसीलदार युवतीची व्यथा

author img

By

Published : Jun 23, 2021, 11:47 AM IST

अमरावती शहरातील अकोली या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या प्राजक्ता बारसे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होताच तिच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी सलग महिना, दोन महिने गर्दी झाली. मात्र प्राजक्ता कुठे रुजू झाली नाही. ती घरीच दिसते, यामुळे आता अनेक लोक का हो, तुमची मुलगी खरंच नायब तहसीलदार झाली ना ? असे प्रश्न आई-वडिलांना विचारतात. यामुळे त्या दोघांनाही वेदना होतात. मला सुद्धा अशा प्रश्नांचा त्रास व्हायला लागला.

Deputy Tahsildar expressed her grief in amravati
आम्हाला रुजू करून आमच्या कामची पोचपावती सरकारने लवकर द्यावी

अमरावती - मजुरी काम करणाऱ्या बापाची मुलगी नायब तहसीलदार झाल्याचा निकाल १९ जून २०२० ला लागला. निकाल समोर येताच अमरावतीच्या अकोली परिसरात राहणाऱ्या बारसे कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदी आनंदाचे वातावरण झाले. मात्र आता वर्ष उलटले तरी सरकारने रुजू होण्याबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. सरकारने आम्हाला रुजू करून लवकरात लवकर आमच्या कामची पोचपावती द्यावी. अशी व्यथा नायब तहसीलदार प्राजक्ता बारसे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.

नायब तहसीलदार तरूणीने मांडल्या व्यथा

का हो खरंच झाली ना नायब तहसीलदार ?

अमरावती शहरातील अकोली या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या प्राजक्ता बारसे राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होताच तिच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी सलग महिना, दोन महिने गर्दी झाली. मात्र प्राजक्ता कुठे रुजू झाली नाही. ती घरीच दिसते, यामुळे आता अनेक लोक, का हो तुमची मुलगी खरंच नायब तहसीलदार झाली ना ? असे प्रश्न आई-वडिलांना विचारतात. यामुळे त्या दोघांनाही मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. मला सुद्धा अशा प्रश्नांचा त्रास व्हायला लागला आल्याचे प्राजक्ता यांनी सांगितले.

आणखी किती प्रतिक्षा करावी -

आता नायब तहसीलदार म्हणून नियुक्ती होऊन वर्ष उलटले आहे. सुरूवातीला कोरोनामुळे आम्हाला रुजू करण्यास उशीर झाला. हे कारण आम्ही समजू शकलो. मात्र त्यानंतर मराठा आरक्षणाच्या वादात आमच्या रुजू होण्याचा विषय अडकला. आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मात्र आम्हाला रुजू करून घेतील असे वाटत होते. मात्र तशा कुठल्याही हालचाली दिसत नसल्याबाबत प्राजक्ताने खंत व्यक्त केली.

रोजगार हमीचे काम तरी द्या -

नायब तहसीलदार म्हणून मला सरकार कधी रुजू करून घेणार हे माहिती नाही. आमच्या घरची परिस्थिती नाजूक आहे. आज आई मजुरी कामावर गेली आणि वडिलांना कुठे काम मिळत नाही म्हणून ते घरी परतले. सरकारने निदान आमची परिस्थिती समजून घ्यावी. मला रोजगार हमीचे काम तरी द्यावे असे प्राजक्ता बारसे सांगितले.

प्राजक्ता आहे कॉम्प्युटर इंजिनियर-

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणारे सावनेर हे बारसे कुटुंबियांचे मूळ गाव. २००९ मध्ये प्राजक्ता दहावी झाली आणि पुढील शिक्षणासाठी बारसे कुटुंबीयांनी अमरावतीत राहायला जायचा निर्णय घेतला. त्यावेळी प्राजक्ताचे मामा किशोर गावंडे यांनी बहिण आणि जावयांना राहण्यासाठी अकोली येथील आपल्या जागेवर झोपडी बांधून दिली. प्राजक्ताचे आई- वडील दिघेही मजुरी करायचे. अमरावतीच्या शासकीय तंत्रनिकेतन येथून बारावी झाल्यावर प्राजक्ताने सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातून कम्प्युटर इंजिनियरिंगची पदवी घेतली. यानंतर पुण्याच्या एका कंपनीत तिला कामाची संधी मिळाली. मात्र सॉफ्टवेअर क्षेत्रातील नोकरी नाकारून महसूल विभागात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 2016 पासून प्राजक्ताने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. व १९ जून २०२० ला ती नायब तहसीलदार पदाची परिक्षा पास झाली.

हेही वाचा - Fathers Day Special : 123 बेवारस दिव्यांगांचे पालक शंकरबाबा पापळकर; 24 लेकरांचे केले थाटामाटात लग्न

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.