ETV Bharat / state

तिबार पेरणी झाल्यानं शाळेचे उरलेले शुल्क भरण्याची परिस्थिती नाही, पण टीसी-मार्कशीट देण्यास शाळेचा नकार

जगदीश काटगळे यांच्याकडे चार एकर शेती आहे. गेल्या वर्षी उत्पन्न झाले नाही. त्यातून सावरत त्यांनी यावर्षी उसनवार पैसे आणून शेतात सोयाबीन पेरले. त्यात बोगस बियाणे व सुरुवातीला पावसाने मारलेली दडी त्यामुळे तिबार पेरणीचे संकट आले. आता घरात पैसाच नसल्याने मुलाचे उरलेले शुल्क ते भरू शकत नाहीत. मुलाची टीसी मार्कशीट लागल्यास 22 हजार रुपये भरावेच लागेल अन्यथा तुम्हाला टीसी मार्कशीट मिळणार नाही, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे.

indian-military-school
शिल्लक 'फी'साठी सैनिकी शाळेचा अमरावतीतील शेतकऱ्याच्या मुलाची टीसी-मार्कशीट देण्यास नकार
author img

By

Published : Aug 29, 2020, 11:33 AM IST

Updated : Aug 29, 2020, 11:40 AM IST

अमरावती - सर्वसामान्य पालकांच्या मुलांनी भरलेल्या शैक्षणिक शुल्कावर गडगंज झालेल्या शैक्षणिक संस्था कोरोना काळातही शेतकऱ्यांच्या मुलांवर शैक्षणिक शुल्कासाठी जबरदस्ती करत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे. इयत्ता बारावीचे शिल्लक असलेले शैक्षणिक शुल्क भरले नाही म्हणून त्या विद्यार्थ्याची टीसी-मार्कशीट अडवून ठेवल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सैनिकी शाळेने केला आहे. याप्रकरणी आता शेतकरी पित्याने सरकारकडेच मदतीची याचना केली आहे.

जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुसळी कामनापूर येथील यश जगदीश काटगळे या शेतकऱ्याच्या मुलाने पुलगाव येथील सैनिकी शाळेत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. आता त्याला पुढील शिक्षण धामणगाव रेल्वेतील आदर्श महाविद्यालयात घ्यायचे आहे. मात्र, या विद्यार्थ्याकडे सैनिकी शाळेचे 22 हजारांचे शैक्षणिक शुल्क शिल्लक आहे. यावर्षी बोगस बियाणे व पावसाने सुरुवातीला दडी मारल्याने तिबार पेरणीचे संकट या विद्यार्थ्यांच्या वडिलांवर आले आहे. त्यामुळे घरात होता नव्हता पैसा शेतीत लागून गेला. मुलाची 22 हजारांची शिल्लक फी भरण्याची परिस्थितीही नसल्याने आता सैनिकी शाळेने त्याला टीसी आणि गुणपत्रिका देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आपल्या मुलाला पुढील शिक्षण कसे द्यावे? असा प्रश्न या शेतकरी बापाला पडला आहे.

शिल्लक 'फी'साठी सैनिकी शाळेचा अमरावतीतील शेतकऱ्याच्या मुलाची टीसी-मार्कशीट देण्यास नकार
जगदीश काटगळे यांच्याकडे चार एकर शेती आहे. गेल्या वर्षी उत्पन्न झाले नाही. त्यातून सावरत त्यांनी यावर्षी उसनवार पैसे आणून शेतात सोयाबीन पेरले. त्यात बोगस बियाणे व सुरुवातीला पावसाने मारलेली दडी त्यामुळे तिबार पेरणीचे संकट आले. आता घरात पैसाच नसल्याने मुलाचे उरलेले शुल्क ते भरू शकत नाहीत. मुलाची टीसी मार्कशीट लागल्यास 22 हजार रुपये भरावेच लागेल अन्यथा तुम्हाला टीसी मार्कशीट मिळणार नाही, असे शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मुलाला पुढील शिक्षणासाठी इतर महाविद्यालये प्रवेश कसा देणार? असा प्रश्न या शेतकरी कुटुंबांना पडला आहे. त्यामुळे आता त्यांनी थेट सरकारकडेच मदत मागितली आहे.

प्रकरणी शाळा प्रशासनाची बाजू -

यश काटगळे हा विद्यार्थी इयत्ता पाचवीपासून आमच्या सैनिकी शाळेत शिकत आहे. आतापर्यंत आम्ही शिक्षणासह हवी ती मदत केली. शाळेचे शुल्क जुलै किंवा ऑगस्टपर्यंत भरणे अनिवार्य असते. परंतु, यशच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगितल्याने शुल्क भरण्यास काही महिने सूट दिली. मात्र, वर्ष उलटूनही यशच्या वडिलांनी शाळेचे शुल्क भरले नसल्याने आम्ही त्याची टीसी मार्कशीट अडवली आहे, असे शाळा प्रशासनाने सांगितले.

Last Updated : Aug 29, 2020, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.