अमरावती - रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणातील फरार सूत्रधार डॉ. पवन मालुसरे याने मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर राहत आत्मसमर्पण केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यामुळे मालुसरेची रवानगी कारागृहात करण्यात आली.
11 मे रोजी झाली कारवाई
शहर गुन्हे शाखेच्या पथकाने 11 मे ला शहरात वेगवगेळ्या ठिकाणी धाड टाकली. त्यात, 12 रेमडेसिवीरसह वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन मालुसरेसह अन्य सात कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली होती. परंतु, त्यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या आरोपींची पोलीस कोठडी न घेतल्यामुळे न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली होती. डॉ. मालुसरे सह परिचारीका व डॉ. राठोड यांना न्यायालायाने अंतरिम जामिन दिला होता.
![डॉ.पवन मालुसरेंचे आत्मसमर्पण](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-05-drmalsure-surender-himself-vis-7205575_15062021225139_1506f_1623777699_405.jpg)
हेही वाचा - कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून शेकापचे मा.आमदार विवेक पाटील यांना अटक