ETV Bharat / state

अमरावतीच्या तपोवन गेट परिसरात 60 लिटर गावठी दारू जप्त - गावठी दारू जप्त तपोवन

तापोवन गेट परिसरात पोलिसांनी आज (शनिवारी) राजुरा बेड्यावरून येणारी 60 लिटर गावठी दारू जप्त केली. या गावठी दारूची किंमत 62 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

illegal desi liquor
अमरावतीच्या तपोवन गेट परिसरात 60 लिटर गावठी दारू जप्त
author img

By

Published : Apr 11, 2020, 11:34 PM IST

अमरावती - तापोवन गेट परिसरात पोलिसांनी आज (शनिवारी) राजुरा बेड्यावरून येणारी 60 लिटर गावठी दारू जप्त केली. या गावठी दारूची किंमत 62 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. कोरोनामुळे संचारबंदी असताना दारूची सर्व दुकाने बंद आहेत. असे असताना शहरातील फ्रेझरपुरा, वडाळी या भागात गावठी दारूची विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे.

राजुरा आणि इतर पारधी बेड्यावरून मोठ्याप्रमाणात गावठी दारू अमरावतीत येत आहे. राजुरा येथून एक दुचाकीसावर गावठी दारू घेऊन असल्याची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तपोवन गेट परिसरात सापळा रचला. त्यानंतर अजय नुरजान भोसले या युवकाची दुचाकी अडवून झडती घेतली असता, त्याच्याजवळ गावठी दारूचा साठा सापडला.

पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शेखर गेडाम, सतीश देशमुख, सुभाष पाटील, विशाल वाकपांजर, रोशन वऱ्हाडे, जाहीर शेख यांनी ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.