ETV Bharat / state

..तर भाजपात प्रवेश करेन; राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

कृषी विधेयकावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना माझ्या दोन अटी मान्य केल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

I will join the bjp  Minister of State bacchu kadu said in amravati
... तर भाजपा प्रवेश करेन; राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान
author img

By

Published : Oct 4, 2020, 9:44 PM IST

अमरावती - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी आणलेल्या कृषी विधेयक कायद्यात माझ्या दोन अटी मान्य केल्यास मी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे विधान शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारने नुकतेच काही दिवसांपूर्वी कृषी विधेयक धोरण देशात लागू केले आहे. या धोरणांतर्गत शेतकऱ्यांना बाजार समिती बाहेर कुठेही शेतमाल विकता येणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. दरम्यान या कायद्याला काँग्रेससह आदी पक्षांनी विरोध केला केला. शिवसेनेने या विधेयकाला पाठींबा दिला होता; मात्र राज्यभेत सभात्याग केला.

दरम्यान या कृषी विधेयकावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना 50 टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. 50 टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मिळालेला नाही. कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50 टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानूसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास मी भाजपामध्ये प्रवेश करेन, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.