ETV Bharat / state

'गडचिरोलीत ग्रामपंचायत निवडणूक हेच राज्यात कायदा-सुव्यवस्था सुरळीत असल्याचे द्योतक' - amravati political news

राज्यात कायदा-सुव्यवस्था सुरळीत नाही, आशी ओरड करणाऱ्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

anil
author img

By

Published : Feb 4, 2021, 6:48 PM IST

Updated : Feb 4, 2021, 6:59 PM IST

अमरावती - महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यातील सर्व 320 ग्रामपंचतीसाठी निवडणुका घेण्यात आल्या. गडचिरोली नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव असणाऱ्या झवेरी खुर्द या गावात 57 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक प्रक्रिया पार पडली असून राज्यात कायदा-व्यवस्था सुरळीत असल्याचे हे उदाहरण आहे. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्था सुरळीत नाही, आशी ओरड करणाऱ्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त अनिल देशमुख अमरावतीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यात 12 हजार 500 पोलीस भरती

कोरोनामुळे 300 पोलीस कर्मचारी दगावले आहेत. कोरोनानंतर राज्याची आर्थिक घडी बिघडली हे सत्य आहे. अशा परिस्थितीत राज्यात 12 हजार 500 पोलिसांची नव्याने भरती करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 5 हजार 300 पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित भरती केली जाणार आल्याचे अनिल देशमुख म्हणाले.

मुन्ना यादवचा फडणवीसांशी काय संबंध?

नागपूरमधील क्रमांक एकचा गुन्हेगार मुन्ना यादव हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे, हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करायला हवे. खरे तर या गुंड व्यक्तीचा मोबाइल क्रमांक स्वतःच्या मोबाइल फोनमध्ये ठेवणाऱ्या फडणवीसांचा मुन्ना यादवशी काय संबध हे स्पष्ट व्हायला हवे, असे ते म्हणाले.

अमरावतीत दोन पोलीस ठाण्यांची मागणी

आज अमरावतीत पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत अमरावतीत दोन नव्या पोलीस ठाण्याची मागणी समोर आली आहे. आता पोलीस भरती झाल्यावर अमरावतीत दोन नवीन पोलीस ठाणी सुरू केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Feb 4, 2021, 6:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.