अमरावती - बुधवारी रात्री पासून सुरू असलेल्या पावसाची स्थिती पाहता शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळांसह खासगी शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या बाबत आदेश देखील शाळांना पाठवण्यात आलेले आहे. पावसाची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील आतापर्यंत ४७८.९ मिमी म्हणजे ५८.८ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सर्वाधिक पाऊस चिखलदरा तालुक्यात झालेला आहे. चिखलदरा येथे ९४६.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून आज शिक्षण विभागाकडून सुटी देण्यात आली आहे.