ETV Bharat / state

Amravati Hill Beautification : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कुऱ्हा मार्गावरील उजाड टेकडी होते आहे हिरवीगार - तिवसा टेकडी सौंदर्यीकरण

दगडांचा सडा पडला असणारी उजाड अशी टेकडी सामाजिक वनीकरणाच्या ( Amravati Hill Beautification ) माध्यमातून विविध प्रजातींच्या वृक्षांनी हिरवीगार होते आहे. तिवसा तालुक्यात येणाऱ्या अमरावती ते कुऱ्हा मार्गावर ( Amravati Kurha Road Hill Plantation ) उजव्या बाजूला 25 एकर जागेवर पसरलेली ही टेकडी अनेकांचे लक्ष वेधत आहे.

Teosa Hill Beautification
Teosa Hill Beautification
author img

By

Published : Apr 13, 2022, 3:09 PM IST

Updated : Apr 13, 2022, 4:05 PM IST

अमरावती - ग्रामस्थांच्या मदतीने दगडांचा सडा पडला असणारी उजाड अशी टेकडी सामाजिक वनीकरणाच्या ( Amravati Hill Beautification ) माध्यमातून विविध प्रजातींच्या वृक्षांनी हिरवीगार होते आहे. तिवसा तालुक्यात येणाऱ्या अमरावती ते कुऱ्हा मार्गावर ( Amravati Kurha Road Hill Plantation ) उजव्या बाजूला 25 एकर जागेवर पसरलेली ही टेकडी आता या मार्गावरून जाणार्‍या प्रत्येकाचे लक्ष वेधत आहे.

प्रतिक्रिया

जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम - महाराष्ट्र शासनाच्या हरित टेकडी उपक्रमांतर्गत अमरावती-कुऱ्हा मार्गावर असणाऱ्या या टेकडीचा सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होतो आहे. गत वर्षी मार्च महिन्यात या टेकडीवर मृदा जलसंधारणाचे काम करण्यात आले. यामुळे यावर्षी पावसाळ्याचे पाणी या टेकडीवरून वाहून न जाता ते टेकडीवरच मुरले गेले. टेकडीच्या पायथ्याशी 30 बाय 30 मीटर आकाराचा तलाव खोदण्यात आले आहे. या तलावात आधी पावसाचे पाणी साठवण्यात आले, तर त्यानंतर टँकरद्वारे पाणी आणण्यात आले. मात्र, आता 1 मार्च रोजी टेकडीच्या पायथ्याशी बोअर खोदण्यात आले. या बोअरला शंभर फुटावर चार इंच पाणी लागले. या बोअरचे पाणी आता तलावात साठविण्यात येत आहे. तलावातील पाणी उंच टेकडीवर नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून या तलावातील पाणी एका टँकरमध्ये भरून हा टँकर टेकडीला फेरी मारत असतो. या टँकरमधील पाणी टेकडीवर नेण्यासाठी लगतच्या गावांमधील मजुरांची मदत घेतली जात आहे.

एकूण 7777 वृक्षांची लागवड - 25 एकरच्या या टेकडीवर एकूण 7777 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. एकूण 23 प्रजातींच्या वृक्षांची लागवड या टेकडीवर करण्यात आली असून यामध्ये सागवान, निंब, चिंच, बांबू, सेमल, शिसम, सिताफळ, फापडा, शेवगा, करंज, कांचन शिसम, सेमल, सिमारुबा, आदी वृक्षांचा समावेश असल्याची माहिती तिवसा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष धापड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. एकूण 7777 पक्षांपैकी 7500 वृक्ष भर उन्हातही जिवंत असल्याचे संतोष धापड म्हणाले.

पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन - अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघात ओसाड टेकडी हिरवी करण्याची किमया सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून केली जात आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी या टेकडीला गत काही महिन्यात अनेकदा भेट दिली. ही टेकडी हिरवीगार व्हावी यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचे ही मार्गदर्शन मिळत असल्याचे तिवसा वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थापड म्हणाले. पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन हे आमचे मनोबल वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरत असल्याचेही संतोष थापडे यांनी सांगितले.

टेकडीवर ओपन जिमचीही व्यवस्था - या टेकडीवर ओपन जिमची व्यवस्था करण्यात येत असून टेकडीच्या माथ्यावर निरीक्षण मनोरा उभारण्यात येतो आहे. येत्या काही दिवसातच या टेकडीचा कायापालट होणार असून लगतच्या गावातील युवकांना या टेकडीवर व्यायाम करण्यासाठी जिम उपयुक्त ठरणार असून अमरावती कुऱ्हा मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला काहीवेळ थांबावेसे वाटेल इतकी सुंदर ही टेकडी होणार, असा विश्वास संतोष धापड यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - CBI Raid in Nagpur : नागपुरातील केंद्रीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयात सीबीआयची झाडाझडती

Last Updated : Apr 13, 2022, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.