अमरावती - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार अमरावती जिल्ह्यात पुन्हा आज (शुक्रवारी) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना पुन्हा फटका बसला आहे. रब्बी हंगामातील काढणीला आलेला कांदा या पावसामुळे भिजला असून संत्रा बागांसह पालेभाज्यांचा मोठा नुकसान झाला आहे. दरम्यान मागील अनेक दिवसापासून उकाड्यातून नागरीक हैराण होते. परंतु या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अमरावती जिल्ह्यात वादळी वार्यासह जोरदार पाऊस - अमरावती लेटेस्ट न्यूज
रब्बी हंगामातील काढणीला आलेला कांदा या पावसामुळे भिजला असून संत्रा बागांसह पालेभाज्यांचा मोठा नुकसान झाला आहे. दरम्यान मागील अनेक दिवसापासून उकाड्यातून नागरीक हैराण होते. परंतु या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवस विदर्भातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.