ETV Bharat / state

अमरावती : दर्यापूर तालुक्याला मुसळधार पावसाच फटका; शेतात साचले गुडघाभर पाणी - अमरावती पावसामुळे शेतात साचले गुडघाभर पाणी

अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील रोडवर शेतकऱ्यांचे ही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेरलेल्या शेतात अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे.

Heavy rains hit Daryapur taluka in amravati district
अमरावती : दर्यापूर तालुक्याला मुसळधार पावसाच फटका; शेतात साचले गुडघाभर पाणी
author img

By

Published : Jul 11, 2021, 3:58 PM IST

अमरावती - मागील 15 दिवसांपासून विदर्भात पावसाने दांडी मारली होती. त्यानंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अमरावतीत तर मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यात आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे दर्यापूर तालुक्याला जबर फटका बसला आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील रोडवर शेतकऱ्यांचे ही पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पेरलेल्या शेतात अक्षरशः गुडघाभर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाल आहे.

प्रतिक्रिया

कंत्राटदाराने चुकीमुळे शेतात पाणी शिरले -

दरम्यान या संपूर्ण परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी आज तालुक्याचा दौरा केला. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी रस्ता बांधकामाच्या वेळी कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने नाल्या बांधल्याने आमच्या शेतात पाणी साचले, असा गंभीर आरोप देखील शेतकऱ्यांनी केला. तसेच झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली.

थीलोरी गावात पुन्हा शिरले पाणी -

मागील वर्षी जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पावसाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील थिलोरी गावानजीक असल्याने नाल्याला पूर आल्याने गावाला पुराने विळखा घातला होता. त्यामुळे जवळपास १८८ कुटुंबाच्या घरात पाणी शिरले होते. तर अनेकांच्या घराच्या भींतीदेखील कोसळल्या. अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत नाही, तर पुन्हा एकदा ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे व नाल्याच्या चुकीच्या खोलीकरणामुळे पुन्हा एकदा या गावात पाणी शिरले.

हेही वाचा - उज्ज्वल निकम करणार राजकारणात एन्ट्री? एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीनंतर चर्चेला उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.