अमरावती - शहरासह जिल्ह्यात आज (रविवार) जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळामुळे अनेक भागात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.
![Heavy Rain in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-03-strom-and-rain-in-amravati-vis-7205575_29032020175553_2903f_01778_809.jpg)
सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने सर्वांचीच धांदल उडाली. शहरातील कठोरा नाका, गाडगेनगर या भागात मुसळधार पाऊस कोसळला. वादळामुळे काही भागातील झाडे कोलमडली. वादळ शांत झाल्यावर शहरात सर्वत्र जोरदार पाऊस बरसायला लागला. काही भागात छोट्या छोट्या गाराही पडल्या आहेत.
![Heavy Rain in amravati](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-amr-03-strom-and-rain-in-amravati-vis-7205575_29032020175553_2903f_01778_342.jpg)