ETV Bharat / state

अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या कौंडण्यपुरातील पुलाचे पुरामुळे मोठे नुकसान - अमरावती पूर

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे, अमरावती ते वर्धा जिल्ह्याला जोडणारा कौंडण्यपूर येथील पूल पाण्याखाली गेला होता. त्यातच पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरील लोखंडी कठडे अक्षरशः वाहून गेले.

पूल
पूल
author img

By

Published : Aug 30, 2020, 5:41 PM IST

अमरावती - जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांमध्ये चांगला मुसळधार पाऊस झाला आहे. यानंतर अप्पर वर्धा धरणाचे १३ दरवाजे शुक्रवारपासून उघडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला. या पुराचे पाणी नदीकाठच्या शेतांमध्ये शिरले तर काही गावांचा पूर्णतः संपर्क तुटला. तसेच श्री क्षेत्र कौडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुलाच्या लोखंडी पाईपांची तुटफुट झाली आहे.

कौंडण्यपुरातील पुलाचे पुरामुळे मोठे नुकसान

पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे शनिवारी १३ ही दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले. त्यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला. यामुळे अमरावती ते वर्धा जिल्ह्याला जोडणारा कौंडण्यपूर येथील मोठा पूल हा काल पाण्याखाली गेला होता. त्यातच पाण्याचा वेग जास्त असल्याने या पुलावरील लोखंडी कठडे अक्षरशः वाहून गेले. तर पुलावर मोठ्या प्रमाणात गाळ देखील साचला आहे. यासह पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून दोन्ही बाजूच्या लोखंडी पाईपांमध्ये मोठमोठे खोडे अटकल्यामुळे या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे झाले होते.

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या या पुलाची दुरुस्ती होण्याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, वर्धा नदीचा पूर ओसरला असून वर्धा जिल्ह्यात जाणारा हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा - गोंदिया जिल्ह्यातील २० गावांना पुराचा वेढा; शेकडो घरांमध्ये शिरले पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.