अमरावती - यावर्षी अर्धा पावसाळा संपला असून सुद्धा राज्यात अनेक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात आजही ट्रॅकरने पाणी पुरवठा सुरू आहे. दुष्काळ निवारण व्हावे यासाठी अनेक ठिकाणी देवी-देवतांची पूजा करुन साकडे घालण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील आठ मुस्लिम बांधव हज यात्रेकरिता सौदी अरेबियात गेले आहे. त्यांनी देखील राज्यात पाऊस पडू दे आणि राज्याला दुष्काळ मुक्त कर असे साकडे या बांधवांनी अल्लाहकडे घातले आहे.
सौदी अरेबिया देशातील मक्का मदिना या ठिकाणी हज ही पवित्र यात्रा भरते. आयुष्यातून एकदा तरी ही यात्रा करावी, असा कुराणमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे हज यात्रा करण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. अशाच आठ मुस्लिम बांधवानी हज यात्रेला जाऊन महाराष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावे, असे साकडे घातले आहे.