ETV Bharat / state

७३ फूट उंचीच्या खांबाला झेंड्याचे कापड चढविण्याचा चित्तथरारक क्षण... सावंगा विठोबा येथील अनोखा गुढीपाडवा

सावंगा - विठोबा येथील श्रीकृष्ण अबधुत महाराजांच्या मंदिरात मूर्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, याठिकाणी कोणत्याही देवाची मूर्ती नाही. तटबंदी वाड्याच्या स्वरूपातील मंदिरात ७३ फूट उंचीची दोन झेंडे उभारण्यात आले आहे. अवधूत महाराज आणि त्यांच्या सेवकांचे हे प्रतिक असल्याचे मानण्यात येते

author img

By

Published : Apr 7, 2019, 10:15 AM IST

७३ फुटी खांबांवर ध्वज फडकावला जातो

अमरावती - गुढीपाडव्याचा सण काल सर्व राज्यभरात साजरा झाला. अमरावती जिल्ह्यातील पोहरा - चिरोडी मार्गावरील सावंगा विठोबा येथेही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा झाला. येथील श्रीकृष्ण अवधूत महाराज देवस्थानाच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले. या देवस्थानात मूर्तीपूजा न करता प्रांगणातील ७३ फुटी उंचीच्या दोन खांबांना ध्वजाचे कापड चढविण्यात येते. कापड चढविण्याचा हा चित्तथरारक क्षण सर्व भाविकांनी अनुभवला.

सावंगा विठोबा या ठिकाणी मूर्तीपुजा केली जात नाही

सावंगा - विठोबा येथील श्रीकृष्ण अबधुत महाराजांच्या मंदिरात मूर्ती पूजेला स्थान नाही. त्यामुळे, याठिकाणी कोणत्याही देवाची मूर्ती नाही. तटबंदी वाड्याच्या स्वरूपातील मंदिरात ७३ फूट उंचीची दोन झेंडे उभारण्यात आले आहे. अवधूत महाराज आणि त्यांच्या सेवकांचे हे प्रतिक असल्याचे मानण्यात येते. या झेंड्याला पाय न लागू देता एकाचवेळी जुने कापड काढणे आणि नवीन चढविण्याची प्रथा येथे सातशे वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते.

गेल्या सात वर्षांपासून चारणदास कांडलकर हे झेंड्याचे कापड काढणे आणि चढविण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. झेंड्याला कापड चढविण्याचा मान हा श्रीकृष्ण अवधूत महाराजांचा प्रसाद असल्याचे मानण्यात येते. गुढीपाडव्याला सायंकाळी ६ वाजल्यापासून झेंड्याचे जुने कापड काढून नवीन चढविण्यास सुरुवात होते.

७३ फुटांच्या दोन्ही झेंड्यांना दोरखंड बांधून त्या दोरावरून चारणदास कांडलकर हे वर चढतात. आणि उतरताना दोरांची प्रत्येक पायरी सोडत खाली येतात. दोन तासांपर्यंत हा चित्तथरारक प्रकार सुरू असताना अवधुती भजनाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून जातो. गुढी पाढव्याच्या पर्वावर लाखो रुपयांचा कापूर येथे नवस फेडण्यासाठी जाळला जातो. अमरावतीसह लगतच्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील लाखो भाविक गुढीपाडव्याला सावंगा - विठोबा या गावात आले होते.

Intro:शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या पोहरा- चिरोडी मार्गावरील सवंगा- विठोबा येथील श्रीकृष्ण अवधूत महाराज देवस्थानात मूर्ती पूजेला फाटा देत गुढीपाडव्याला यात्रा भरते. गुढीपाडव्याच्या पर्वावर भाविक येथे कपूर जाळून नवस फेडतात तसेच मंदिरालगत असणाऱ्या ७३ फूट उंचिच्या दोन खांबांना कापड चढविण्यात येतो. या खंबाना कापड चडविण्याचा चित्तथरारक अनुभव दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भाविकांनी अनुभवला.

Body:सवंगा- विठोबा येथील श्रीकृष्ण अबधुत महाराजांच्या मंदिरात मूर्ती पूजेला स्थान नसल्याने याठिकाणी कोणत्याही देवाची मूर्ती नाही. तटबंदी वाड्याच्या स्वरूपातील मंदिरात ७३ फूट उंचीची दोन झेंडे उभारण्यात आले आहे. अवधूत महाराज आणि त्यांच्या सेवकांचे हे झेंडे प्रतिक असल्याचे मानण्यात येते.
या झेंड्याला पाय न लागू देता एकाचवेळी जुने कापड काढणे आणि नवीन चढविण्याची प्रथा येथे सातशे वर्षसंपासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. साध्य गत सात वर्षांपासून चारणदास कांडलकर ही ४५ वर्ष वयाची व्यक्ती झेंड्याचे कापड काढणे आणि चढविण्याची जबाबदारी पूर्ण करीत आहे. झेंड्याला कापड चढविण्याचा मान हा श्रीकृष्ण अवधूत महाराजांचा प्रसाद असल्याचे मानण्यात येते. गुढीपाडव्याला सायंकाळी ६ वाजता पासून झेंड्याचे जुने कापड कडून नवीन चडविण्यास सुरुवात होते. ७३ फुटांच्या दोन्ही झेंड्यांना दोरखंड बांधून त्या दोरावरून चारणदास कांडलकर हे वर चढतात. आणि उतरताना दोरांची प्रत्येक पायरी सोडत खाली येतात. दोन तासांपर्यंत हा चित्तथरारक प्रकार सुरू असताना अवधुती भजनाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून जातो. गुढी पाडव्याच्या पर्वावर लाखो रुपयांचा कपूर येथे नवस फेडण्यासाठी जळतात.अमरावतीसह लगतच्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील लाखो भाविक गुढीपाडव्याला सवंगा- विठोबा या गावात आले आहेत. गावातील प्रत्येक घर आज पावण्यांनी भरले असून गावातील धर्मशाळांमध्ये भाविकांच्या राहण्याची व्यवस्थ करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.