अमरावती - लोकांना रानभाज्यांचे महत्त्व कळावे, यासाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही हा रानभाजी महोत्सव अमरावतीमध्ये भरवण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात करण्यात आला आहे.
अमरावतीत रानभाज्या महोत्सवाचा पालकमंत्री यशोमती ठाकुरांच्या हस्ते शुभारंभ - Guardian Minister Yashomati Thakur News
रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘रानभाजी महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानभाज्या औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्यासाठी उपयुक्त असतात.
अमरावती रानभाज्या महोत्सव
अमरावती - लोकांना रानभाज्यांचे महत्त्व कळावे, यासाठी दरवर्षी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही हा रानभाजी महोत्सव अमरावतीमध्ये भरवण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात करण्यात आला आहे.
Last Updated : Aug 14, 2020, 3:35 PM IST