ETV Bharat / state

यावलीमध्ये ग्रामगीता सप्ताहाला सुरुवात; ३० तारखेला तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव

author img

By

Published : Apr 26, 2019, 11:49 PM IST

३० तारखेला सकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण असा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

अमरावती - विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अर्थात ग्रामजयंती महोत्सवानिमित्त ग्रामगीता सप्ताहाला सुरुवात झाली आहे. येत्या ३० तारखेला प्रातःकाळी ४ ते ६ वाजेपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य दिव्य डोळे दिपवणारा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे. महाराष्ट्रातून हजारो गुरुदेव भक्त अमरावतीच्या यावली गावात दाखल होणार आहेत.

यावलीमधील ग्रामगीता महोत्सव

तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जिल्ह्यातील यावली शहीद या गावात ग्रामजयंती महोत्सवाला २३ तारखेला सकाळी ५ वाजता सुरुवात झाली. ७ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमात सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान व चिंतन, सहा ते साडेसात रामधून आणि भाषण, आठ ते अकरा सुसंस्कार शिबीर, दुपारी ३ ते ६ संगीत ग्रामगीता, प्रवचन, सायंकाळी ७ ते साडेसात सामुदायिक प्रार्थना, असे दैनंदिन कार्यक्रम होत आहेत.

विशेष कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कीर्तन, सुरसंगम गीत, पंचरंगी प्रभोधन कार्यक्रमासह आदी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रविवारी स्मशानभूमीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ३० तारखेला सकाळी ४ ते ६ वाजण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण असा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे. दुपारी १ ते ३ दरम्यान गोपाळ काला आणि महाप्रसाद, तर रात्री ९ ते ११ दरम्यान सप्तखंजेरी वादक इंजिनिअर पवन दवनडे यांच्या प्रभोधन कार्यक्रमाने सांगता होणार आहे.

Intro:अमरावतीच्या यावली गावात तुकडोजी महाराजांच्या ग्रामजयंती महोत्सवाला सुरवात .
तीस तारखेला सकाळी पाच वाजता राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सोहळा.
हजारो गुरुदेव भक्त राहणार उपस्थित
----------------------------------------------
अँकर
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळा अर्थात ग्रामजयंती मोहत्सवा निमित्त युग ग्रँथ ग्रामगीता सप्ताहाला 23 तारखेपासून सुरवात झाली असून तीस तारखेला प्राप्तकाळी 4 ते 6 वाजे दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य दिव्य डोळे दिपवणारा जन्मोत्सव सोहळा पार पडणार असून महाराष्ट्रातुन हजारो गुरुदेव भक्त अमरावतीच्या यावली गावात येणार आहे.
तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात ग्रामजयंती महोत्सवाला 23 तारखेला सकाळी पाच वाजता तीर्थ स्थापनेने सुरवात झाली .सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमात सकाळी साडेपाच वाजता सामुदायिक ध्यान व चिंतन सहा ते साडे सात रामधून व भाषण आठ ते अकरा सुसंस्कार शिबीर दुपारी तीन ते सहा संगीत ग्रामगीता प्रवचन सायंकाळी सात ते साडेसात सामुदायिक प्रार्थना असे दैनदिन कार्यक्रम तर विशेष कार्यक्रम मध्ये राष्ट्रीय कीर्तन ,सुरसंगम गीत,पंचरंगी प्रभोधन कार्यक्रम, सह आदी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.यात रविवारी अठविस तारखेला स्मशानभूमीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तीस तारखेला सकाळी चार ते सहा वाजे दरम्यान महत्वपूर्ण असा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार आहे .दुपारी एक ते तीन दरम्यान गोपाळ काला व महाप्रसाद व रात्री नऊ ते अकरा दरम्यान सप्तखनजेरी वादक इंजिनिअर पवन दवनडे यांच्या प्रभोधन कार्यक्रमाने सांगता होईल.

बाईट २-गुरुदेव भक्तBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.