ETV Bharat / state

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची तरुणाकडून गळा चिरून हत्या, अमरावतीमधील घटना - चुनाभट्टी परिसर

पीडितेने अखेरचा श्वास घेताच नातेवाईकांना रुग्णालयात आक्रोश केला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

अर्पिताला तपासताना डॉक्टर
author img

By

Published : Jul 9, 2019, 5:31 PM IST

Updated : Jul 9, 2019, 7:27 PM IST

अमरावती - शहरातील चुनाभट्टी परिसरात तरुणाने एका विद्यार्थीनीवर चाकूने हल्ला केला. यामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

रुग्णालय परिसरात नातेवाईकांची गर्दी

पीडित तरुणी शहरातील भारतीय महाविद्यालयात बी. कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. ती आज दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शिकवणी वर्गातून मैत्रिणीसोबत घराकडे जायला निघाली होती. त्यावेळी तुषार किरण मस्करे (वय २१) या तरुणाने वेष बदलून तरुणीवर चाकूने हल्ला करून तिचा गळा चिरला. यामध्ये तिची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. परिसरातील नागरिकांनी तिचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान परिसरातील नागरिकांनी हल्लेखोर तरुणाला पकडून चोप दिला. तसेच त्याला राजपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी अधिक तपास राजपेठ पोलीस करीत आहेत.

Intro:अमरावतीच्या चुनाभट्टी परिसरात चाकूने चिरून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. युवतीच्या हत्त्येमुळे तिच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आक्रोश केला.

Body:अर्पिता ठाकरे (17)रा.कवठा बहाळे असे मृत युवतीचे नाव आहे. ती येथील भारतीय महाविद्यालतात बी.कॉम च्या प्रथम वर्षाला शिकत होती आज चुनभट्टी परिसरात रोशनी ढवळी शिकवणी वर्गातून निगली असताना दुपारी 2.45 वाजता तुषार किरण मस्करे (21)रा मलकापूर पांढरी याने वेष बदलून अर्पितावर हल्ला चाकूने हल्ला करून तिचा गळा चिरला. या हल्ल्यात अर्पिताची मैत्रीणही जखमी झाली. दरम्यान परिसरातील युवकांनी तुषार मस्करला पकडून चोप दिला आणि राजपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.
जखमी अर्पिताला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असते उपचारदरम्यान तिची प्राणज्योत मालवली.अर्पिताने अखेरचा श्वास घेताच तिचा नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुगणल्यात आक्रोश करून गोंधळ घातला. जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त रुग्णालय परिसरात लावण्यात आला.या घटनेमुळे शहर हादरले असून राजपेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Conclusion:
Last Updated : Jul 9, 2019, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.