ETV Bharat / state

मोठ्यांनो काहीतरी शिका! बघा अमरावतीतील 'या' चिमुकलीचा अनोखा उपक्रम - अमरावतीतील क्षमता

अमरावतीतील क्षमता ही ९ वर्षीय चिमुकली दरवर्षी तिच्या वाढदिवासनिमित्त वृक्षारोपण करते. वाढत्या वयानुसार झाडांची संख्या देखील वाढवत असते. एवढेच नाहीतर ती तिच्या झाडांची दररोज काळजी घेते.

झाडांची काळजी घेताना चिमुकली
author img

By

Published : Sep 4, 2019, 10:53 AM IST

Updated : Sep 4, 2019, 3:27 PM IST

अमरावती - सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी जनजागृती केली जात आहे. त्यानुसार झाडे देखील लावली जातात. मात्र, त्यानंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. मात्र, अमरावतीतील ९ वर्षीय चिमुकली त्याला अपवाद ठरली आहे. दरवर्षी ती तिच्या वाढदिवसाला शहरात विविध ठिकाणी झाडे लावते. एवढेच नाहीतर त्या झाडांवर लक्ष सुद्धा ठेवते. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मोठ्यांनो काहीतरी शिका! बघा अमरावतीतील 'या' चिमुकलीचा अनोखा उपक्रम, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

क्षमता संतोष ठाकूर, असे या चिमुकलीचे नाव आहे. शहरातील होली क्लास या शाळेत चौथ्या वर्गात शिकते. क्षमताच्या कुटुंबाची परिस्थिती जेमतेमच आहे. मात्र, तिचे बाबा संतोष ठाकूर सामाजिक कार्यात नेहमी समोर असतात. त्यामुळे त्यांनी स्वतः क्षमताच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावले होते. त्यानंतर दुसऱ्या वाढदिवसाला दोन झाडे लावली. असे प्रत्येक वाढदिवसाला झाडांचा संख्या वाढवत गेले. आता क्षमता मोठी झाली. त्यामुळे ती स्वतः झाडांची काळजी घेते. दररोज शाळेत जाताना ती झाडाला पाणी टाकायला विसरत नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, योगगुरू रामदेव बाबा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी, सिंधुताई सपकाळ आदींनी तिच्या या कार्याचे कौतुक केले आहे.

प्रत्येकाने झाडे लावल्यास चांगला पाऊस येईल. त्यामुळे शेतकरी सुखावेल, असे क्षमता सांगते. तिचे वडील प्रत्येक कार्यात तिच्यासोबत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी क्षमताचा प्रस्तावही त्यांनी पंतप्रधान कार्यालयात पाठवला आहे. फक्त फोटो काढण्यासाठी झाडे लावणाऱ्यांनी तिच्याकडून नक्कीच आदर्श घ्यावा. तसेच प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान दोन ते चार झाडे लावल्यास नक्कीच पर्यावरणाचे रक्षण होईल.

पूरग्रस्तांसाठी पाठवली होती मदत -
सांगली, कोल्हापुरातील महापुरात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबीयांसाठी देखील तिने मदत पाठवली होती. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वही, पुस्तके, पेन असे साहित्य दिले होते. तिच्या कार्यामुळे अमरावतीकरांनी प्रेरित होऊन शालेय साहित्य आणून दिले.

Intro:प्रत्येकाने आदर्श घ्यावा या मुलीचा
अमरावतीतील क्षमता करते पुस्तका बरोबर झाडांशी मैत्री.
दरवर्षी वाढदिवसाला वृक्ष लागवडीचा कार्यक्रम.
-----------------------------------------------
स्पेशल स्टोरी
अमरावती अँकर
सध्यां पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीसाठी जनजागृती ही केल्या जाते.अनेक लोक दोन चार झाडे लावून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकतात. परन्तु त्यांनतर मात्र त्या झाडाकडे लक्षही देत नाही.मात्र अमरावती मधील नऊ वर्षीय चिमुकली क्षमता ठाकूर ही अपवाद ठरली आहे.दरवर्षी ती वाढदिवसाला शहरात विविध ठिकाणी झाडे तर लावतेच परन्तु वर्षभर त्या झाडावर लक्ष सुद्धा ठेवते.पुस्तका बरोबरच झाडांशी घट्ट मैत्री करणारी ही प्रतिक्षा आहे तरी कोण पाहूया एक स्पेशल रिपोर्ट...

Vo-1
भविष्य घडवण्यासाठी पाठीवर पुस्तकानी भरलेलं दप्तराच ओझं.... हातात पाण्याची बॉटल .ही आहे. अमरावतीच्या होली क्लास या शाळेत चौथ्या वर्गात शिकणारी क्षमता ठाकूर ही विद्यार्थीनी दरोरोज शाळेत जाताना स्वतःहा लावलेल्या झाडांना पाणी टाकायला मात्र ती कधीच विसरत नाही.त्याच कारण अस तिच्या पहिल्या वाढदिवसा पासून तिचे बाबा शहरात ठीक ठिकाणी झाड लावतात. आता क्षमता मोठी झाली त्यामुळे ती स्वतःहा झाडं लावते आणि त्याच संगोपन सुद्धा करते .

बाईट-1 क्षमता ठाकूर

Vo-2
क्षमताच्या कुटुंबाची परिस्थिती तशी जेमतेमच अशा परिस्थितीत सुद्धा सामाजिक कार्यात तिचे बाबा आणि ती समोर असते .त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे,योगगुरू रामदेव बाबा ,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, किरण बेदी,सिंधुताई सपकाळ आदींनी तिच्या कार्याचा गौरव केला आहे. मागील महिन्यात आलेल्या महापूरामुळे उध्वस्त झालेल्या सांगली कोल्हापूर मधील विद्यार्थ्यांना वही ,पुस्तक,पेनच्या स्वरूपात छोटीशी मदत क्षमता ने पाठवली.तिच्या या कार्याने प्रेरित होऊन अनेक अमरावती कर क्षमता कडे शालेय उपोयोगी साहित्य आणून देत आहे.आज पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी सुरू असलेल्या क्षमताच्या कार्याची चर्चा अमरावती शहरात चांगली सुरू आहे.आपण जर झाड लावले तर चांगला पाऊस होईल आणि शेतकरीही सुखावेल अस क्षमता सांगते.

बाईट-क्षमता ठाकुर

तिच्या या सामाजिक कार्याची मुहूर्त वेढा रोवणारे तिचे वडील नेहमी तिच्या सोबत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात याप्रसिद्ध कार्यक्रमा साठी त्यांनी क्षमताचा प्रस्तावही पंतप्रधान कार्यालयात पाठवला.

बाईट-3-संतोष ठाकूर -वडील

दोन चार झाड लावायची ,त्याचे फोटो सेशन करायचे,नंतर एखाद्या पेपर मध्ये बातमी लावायला धडपड करायची पण महिन्या भरा नंतर ते झाड कस आहे .हे पाहायलाही वेळ नसणाऱ्या स्वयंघोषित सामजिक कार्यकर्तानी मात्र या नऊ वर्षाच्या क्षमताचा आदर्श घ्यावा. आणि प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाला किमान दोन चार झाडं जरी लावले तरी शासनाला वृक्ष लागवडीचे कार्यक्रम हाती घेण्याची गरज पडणार नाही....Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 4, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.