ETV Bharat / state

नांदगाव खंडेश्वर पाण्यात आढळला जिवंत नारू सदृश्य जंतू ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

author img

By

Published : Sep 11, 2020, 4:54 PM IST

गुरुवारी सकाळी नांदगाव शहरातील ओंकारखेडा परिसरातील वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी हरिदास राऊत यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू नळातुन आढळून आल्याने एकच खळबळ माजली.

नारू
नारू

अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतद्वारे शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गुरुवारी सकाळी नांदगाव शहरातील ओंकारखेडा परिसरातील वार्ड क्रमांक 5 येथील रहिवाशी हरिदास राऊत यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू नळातुन आढळून आल्याने एकच खळबळ माजली. त्यामुळे या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी याबाबतची सूचना नगरपंचायतला दिली.

नांदगाव खंडेश्वर पाण्यात आढळला जिवंत नारू सदृश्य जंतू

नारू सदृश्य जंतू हा एक ते दिड फुट लांब असुन बारीक सुताच्या आकाराचा आहे. गावात सर्दी ताप डोकेदुखी, असे आजार मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहे. नांदगाव नगरपंचायतने वॉटर फिल्टरकडे काळजीपुर्वक लक्ष्य देवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा शहरवासीयांना करावा आणि आरोग्य विभागाने पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेकडे लक्ष्य द्यावे , अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

धोकादायक नारू पाण्यातून निघत असतील, तर नगरपंचायत कडून पाण्याचे नियमित साफसफाई होते का ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या घटनेमुळे नांदगावकरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून याकडे नांदगाव नगरपंचायतने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या भागातील नागरिकांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.