अमरावती - मेळघाटातील चिखलदरा येथील ऐतिहासिक गाविलगडाकडे याला गुरुवारी ( 5 एप्रिल ) आग लागली. या आगीमुळे किल्ल्याचे प्रचंड नुकसान झाले ( Gavilgad Fort Burn In Fire ) आहे. भर उन्हात लागलेल्या आगीत गवत आणि अनेक वृक्ष नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे गाविलगड किल्ला परिसर पूर्णतः जळून खाक झाला आहे.
वनकर्मचारी आले धावून - गाविलगड किल्ल्याला आग लागल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी परिसरातील जंगलात धावून आले. चिखलदरा येथील वनपरिक्षेत्राधिकारी दिनेश वाळकेंच्या नेतृत्वात ब्लोअर मशीनद्वारे वन कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
वन्य प्राणी होरपळले - या आगीमुळे गाविलगड जंगल परिसरात असणारे वन्यप्राणी होरपळून गेले आहेत. या जंगलात वाघ, बिबट, नीलगाय, हरीण, काळवीट, ससे असे वन्यप्राणी आहेत. या आगीची झळ अनेक वन्यप्राण्यांना बसली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हे आहे आगीचे कारण! - गाविलगड किल्ला परिसर हा व्याघ्र प्रकल्पाच्या ताब्यात आहे. या परिसरात गुराख्यांना जनावरे चरण्यास बंदी घालण्यात आली आहे. दोन वर्षांपासून या भागात जनावरांना चराईसाठी जाऊ दिले जात नाही. त्यामुळे काही गुराख्यांनी हा जंगल परिसर पेटवून दिला असल्याची शंका वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
हेही वाचा - विज्ञान खोटे बोलत नाही, मोदी खोटे बोलतात; कोरोना मृत्यू संख्येवरून राहुल गांधींचा घणाघात