मुंबई - वरळी येथील बीडीडी चाळीत आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ( Gas Cylinder Explosion ) एकाच कुटूंबातील 4 जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यात एका 4 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे, अशी माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे. (Gas Cylinder Explosion in Worli)
गॅस सिलेंडर स्फोट -
गणपतराव जाधव मार्ग बीडीडी चाळ क्रमांक 3, कामगार वसाहत, वरळी येथे एका घरात आज सकाळी 7.11 वाजता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरामध्ये आग लागली. याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जखमी झालेल्या 4 जणांना मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रकृती गंभीर असलेल्यामध्ये एका 4 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. गॅस सिलेंडरमुळे लागलेली आग विझवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - Mamta Banerjee Mumbai Visit : ममता बॅनर्जी घेणार शरद पवारांची भेट
जखमींची नावे -
आनंद पुरी 27 वर्षे (गंभीर)
मंगेश पुरी 4 महिने (गंभीर)
विद्या पुरी 25 वर्षे (प्रकृती स्थिर)
विष्णू पुरी 5 वर्षे (प्रकृती स्थिर)