अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आला आहे. त्यामुळे बियर बार आणि वाईन शॉपला फक्त पार्सल सेवाच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तरी अमरावती शहरानजीक असलेल्या राजुरा येथील एका परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या गावठी दारू तयार केली जात असल्याच्या माहितीवरुन फ्रेजरपुरा पोलिसांनी धाड टाकून 10 ड्रम मोहाचा सडा व 5 ड्रम गावठी दारू असा जवळपास 70 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
कारवाई झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार होते. त्यानंतर ती दारू शहरातील विविध भागात आणून विकली जाते, अशी माहिती पोलिसांना होती. त्याच पार्श्वभूमीवर आज (दि. 18 एप्रिल) दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत या बेड्यावर पोलिसांनी धाडसत्र राबवले. यामध्ये भट्टी लावलेले पाच ड्रम नष्ट केले तर दहा ड्रम मोहाने भरलेले आढळून आले होते. दरम्यान, पोलिसांनी या केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
हेही वाचा - अमरावतीत कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी ४ तास वेटिंग; 'हे' आहे कारण