ETV Bharat / state

खासदार नवनीत राणांकडून सातत्याने कोरोना नियमांचे उल्लंघन; दुर्गोत्सवात केले ढोलवादन - नवनीत राणा ताज्या बातम्या

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडून देखील पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले आहे. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठी आहे का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

navneet rana latest news
navneet rana latest news
author img

By

Published : Oct 14, 2021, 9:45 AM IST

अमरावती - सध्या नवरात्रीचा उत्सव सगळीकडे उत्साहात साजरा होत असला, तरी यावर कोरोनाचे सावट आहे. त्यातच राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे यंदाही गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने करण्यात आले आहे. यासाठी नियमावलीदेखील आखून देण्यात आली आहे. मात्र, असे असताना लोकप्रतिनिधीनाच जबाबदारीचे भान नसून वारंवार त्यांच्याकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडूनदेखील पुन्हा एकदा कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आले आहे. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठी आहे का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

नवनीत राणांकडून ढोलवादन
  • कोरोनाचे नियम डावलत केले ढोल वादन -

खासदार नवनीत राणा यांनी काल परतवाडा शहरातील दुर्गोत्सव मंडळांना भेटी देण्यासाठी गेल्या होत्या. यादरम्यान एका मंडळात ढोल-ताशांचे वादन सुरू होते. अशावेळी खासदार नवनीत राणा यांनाही ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. लागलीच त्यांनी कमरेला ढोल बांधून ढोलवादन केले. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. येथे कुठेही सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते. तसेच यावेळी नवनीत राणा मास्कदेखील घातला नव्हता.

VIDEO : खासदार नवनीत राणांनी घेतला गरब्याचा आनंद; व्हिडीओ व्हायरल

  • दोन दिवसांपूर्वीच केला गरबा -

राज्य सरकारच्या कोरोना नियमांना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या सातत्याने पायदळी तुडवताना दिसत आहे. सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लाऊन त्या गर्दी जमवत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी बंदी असतानादेखील गरब्याच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळीदेखील नवनीत राणा यांच्या तोंडावर मास्क नव्हते.

  • गणेशोत्सवादरम्यानही कोरोनाचे उल्लंघन -

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट डोळ्यासमोर ठेवून यंदाही गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन राज्य शासनाने तसेच अमरावती जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला सर्वसामान्य नागरिक प्रतिसाद देत असताना. जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या खासदार नवनीत राणा यांनी मात्र कोरोनाच्या या नियमांना अक्षरशा वेशीवर टांगले होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक गणपतीच्या महाआरतीचा सपाटा लावला होता.

  • काही महिन्यांपूर्वी विनामास्क बुलेटस्वारी -

अमरावती जिल्ह्यात सद्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी, फेब्रुवारीच्या दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत होती. अशावेळी जबाबदार लोकप्रतिनिधी असलेल्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी एका ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमाला जाताना विनामास्क बुलेटस्वारी करत कोरोना नियमांचे उल्लंघन केले होते.

अमरावतीत राणा दाम्पत्याची विनामास्क बुलेट वारी; कोरोना नियमांचा विसर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.