ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीतही पेटली होती देशाच्या स्वातंत्र्याची मशाल

अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात १९३० साली भारताच्या स्वातंत्र्याची लढाई पेटली होती. त्यानंतर १८ ऑगस्ट १९४२ ला ब्रिटिशांसोबत झालेल्या रक्तरंजित क्रांतीत या गावातील ६ लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती.

author img

By

Published : Aug 15, 2019, 1:20 PM IST

Updated : Aug 15, 2019, 9:53 PM IST

यावली शहीद गाव

अमरावती - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा देशाच्या स्वतंत्र लढ्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात १९३० साली भारताच्या स्वातंत्र्याची लढाई पेटली होती. त्यानंतर १८ ऑगस्ट १९४२ ला ब्रिटिशांसोबत झालेल्या रक्तरंजित क्रांतीत या गावातील ६ लोकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीतही पेटली होती देशाच्या स्वातंत्र्यची मशाल

महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ ला ब्रिटिशांना चले जावचा इशारा दिला होता. त्यानंतर १६ तारखेला चिमूर, आष्टी आणि बेनोडा गावात मोठे आंदोलन झाले होते. तेथील लोकांनी ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तिरंगा फडवकला होता. या तीन गावात झालेल्या क्रांतीत अनेक जण हुतात्मा झाले होते. त्यानंतर २ दिवसांनी या आंदोलनाची ठिणगी यावली गावात पडली. १८ ऑगस्टचा दिवस उजाडला तेव्हा शेकडो ब्रिटिश यावली गावात आले. यावेळी पंजाबराव यावलीकर यांच्या नेतृत्वाखाली या गावात ब्रिटिशांविरोधात लढा सुरू झाला. या लढ्यात लढ्यात ६ स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले होते. तर अनेकांनी गोळ्या झेलल्या होत्या. यात गोमाजी राऊत यांनीही ब्रिटिशांचा सामना केला होता.

सध्या यावली गावात सुमारे ७० स्वातंत्र सैनिक आहेत. याच गावातील जोशीरामजी वासनकर यांनीही ब्रिटिशांच्या गोळ्यांशी सामना केला होता. त्यानंतर त्यांना शिक्षा म्हणून ४ वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते. आजही त्यांच्या आठवणी त्यांच्या पत्नी द्रौपदा बाई वासनकर सांगतात. याच गावातील तुळशीरामजी अंबाडकर हे सुद्धा स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. आपल्या वडिलांनी देशासाठी ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या. मात्र, आपल्या कुटुंबाला शासनाकडून शासकीय योजनेचा फायदा होत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली.

Intro:स्पेशल रिपोर्ट
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीतही पेटली होती देशाच्या स्वातंत्र्यची मशाल.

यावली शहिद गावातील सात लोकांनी दिली प्राणाची आहुती.
------------------------------------------------------------
अँकर
अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ही देशाच्या स्वतंत्र लढ्यात सिहाचा वाटा आहे.त्याच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावात 1930 लाच भारत स्वतंत्रची लठाई पेटली नंतर 18 अगस्ट 1942 ला ब्रिटिशांन सोबत झालेल्या रक्तरंजित क्रांतीत या गावातील सहा लोकांनी देश स्वतंत्र साठी आपल्या प्राणाची आहुती दिली पाहूया एक रिपोर्ट .

8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना चलेंजावं चा इशारा दिला .त्यानंतर 16 तारखेला चिमूर, आष्टी, बेनोडा गावात मोठे आंदोलन झाले .ब्रिटिशांचा ध्वज उतरवून तेथे भारतीय तिरंगा हा तेथील लोकांनी चढवला तीन गावातील करा क्रांतीत अनेक हुतात्मे झाले.येथून दोन दिवसांनी या आंदोलनाची ठिणगी ही यावली गावात पडली .आधल्या दिवशी गुप्त बैठक पार पडली .त्यानंतर 18 ऑगस्ट चा दिवस उजाळला शेकडो ब्रटिश गावात आले आणि पंजाबराव यावलीकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला भारताच्या स्वतंत्रचा लढा यात 6 स्वतंत्र सैनिक धारातीर्थी झाले तर अनेकानी गोळ्या झेलल्या.यात गोमाजी राऊत यांनीही ब्रिटिशांन सोबत सामना केला.

बाईट-रमेश राऊत -स्वतंत्र संग्राम सैनिक पुत्र

याच गावात सुमारे 70 स्वतंत्र संग्राम सैनिक आढळतात याच गावातील जोशीरामजी वासनकर यांनीही ब्रिटिशांच्या गोळ्यांशी सामना केला .तेव्हा त्यांना शिक्षा म्हणून पाच वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले आजही त्यांच्या आठवणी त्यांच्या पत्नी द्रवपदा बाई वासनकर सांगतात.

बाईट-द्रवपदाबाई वासनकर,स्वतंत्र संग्राम सैनिक पत्नी

असेच या गावातील तुळशीरामजी अंबाडकर हे सुद्धा स्वतंत्र संग्राम सैनिक होते.आपल्या वडिलांनी देशासाठी ब्रिटिशांच्या गोळ्या झेलल्या परन्तु आपल्या कुटूंबाला शासनाकडून शासकीय योजनेचा फायदा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

बाईट-3 रमेश अंबाडकर स्वतंत्र संग्राम सैनिक पुत्र

पथर सारे बॉम्ब बनेगे भक्त बनेगी सेना या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने हे गावे पेटून उठली होती.या गावांमध्ये यावलीचाही समावेश आहे .सात लोकांनी आपले बलिदान गावासाठी दिले त्या सात लोकांच्या आठवणी, तो दिवस आजही यावली करांच्या आठवणीत आहे.देशाच्या स्वतंत्र साठी रक्त सांडवणार्या यावलीची ती रक्तरंजित क्रांती आजही अजरामर आहे.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Aug 15, 2019, 9:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.