ETV Bharat / state

अमरावतीत गणेश विसर्जनावेळी 4 तरुण नदीत बुडाले; शोध सुरू - सार्वजनिक गणपती विसर्जन

गावातील सार्वजनिक गणपती विसर्जनादरम्यान चार तरुण गणेश मूर्तीसोबत नदी पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदान न आल्याने ते नदीत बुडाल्याची माहिती आहे.

अमरावतीत बुडालेले चार तरूण
author img

By

Published : Sep 12, 2019, 9:02 PM IST

Updated : Sep 12, 2019, 10:12 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे गणेश विसर्जनादरम्यान नदी पात्रात चार तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी घडली असून घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. दरम्यान, बुडालेल्या तरुणांचा अजूनही शोध लागलेला नाही.

गावातील सार्वजनिक गणपती विसर्जनादरम्यान चार तरुण गणेश मूर्तीसोबत नदी पात्रात उतरले. मात्र, पाण्याचा अंदान न आल्याने ते नदीत बुडाल्याची माहिती आहे. दरम्यान, बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून तरुणांचा शोध सुरू आहे. सतीश अजाबराव सोळंके (वय २८), ऋषिकेश बाबुराव वानखडे (वय २२), संतोष बारीकराव वानखडे (वय ४५), सागर अरुण शेंदुरकर (वय २०) राहणार गौरखेडा असे बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये विसर्जन मिरवणूक उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात खासदार हिना गावितांनीही केले नृत्य

Intro:अमरावती ब्रेकींग

गणेश विसर्जन दरम्यान नदी पात्रात चार जण बुडाले
अमरावती जिल्ह्यातील घटना

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे गणेश विसर्जन दरम्यान नदी पात्रात चार जण बुडाले असल्याची घटना आज सायंकाळी घडली, घटनास्थळी रेस्क्यू पथक पोहचले असून अद्यापही बुडालेल्या गणेश भक्तांचा शोध लागला नाही,

गावातील सार्वजनिक गणपती विसर्जन करताना चार मुले गणेश मूर्ती सोबत बेपत्ता बेपत्ता झाले आहेत, नदीच्या पात्रामध्ये गणपती विसर्जन करीत असताना बेपत्ता झालेली आहे,मात्र अद्यापही नदीत बुडालेल्याचा पत्ता लागला नाही यात बुडालेल्या मध्ये सतीश अजाबराव सोळंके वय २८वर्ष,ऋषिकेश बाबुराव वानखडे वय२२ वर्ष,संतोष बारीकराव वानखडे वय४५ वर्ष, सागर अरुण शेंदुरकर वय२० वर्ष रा.सर्व गौरखेडा येथील आहे,हे आपल्या गावातील गणपती विसर्जन करण्यासाठी नदी पात्रात उतरले असता नदीत गणपती मूर्ती घेऊन सदर गणेश भक्त उतरले मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न लागल्याने ते गणपती सोबत पाण्यात बुडाले घटनास्थळी शोध व बचाव पथक पोहचले असुन रेस्क्यू टीम नदीत बुडालेल्याचा शोध घेत आहे,Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 12, 2019, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.