ETV Bharat / state

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडाळी - Former Zilla Parishad Member of Congress Pravin Ghuikhedkar election

विधानसभा निवडणुकीसाठी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून मूळचे काँग्रेसचे असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी नामांकन अर्ज उचलला होता. ते अपक्ष निवडणूक लढणार असून त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी चांदूर रेल्वेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केला.

अर्ज दाखल करताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर
author img

By

Published : Oct 2, 2019, 1:24 PM IST

अमरावती- धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची गर्दी होत आहे. त्यातच मंगळवारी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी देखील अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. घुईखेडकर यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला मोठे भगदाड पडले असून याचा फटका विद्यमान काँग्रेसच्या आमदारांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

माहिती देताना काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर

विधानसभा निवडणुकीसाठी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून मूळचे काँग्रेसचे असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी नामांकन अर्ज उचलला होता. ते अपक्ष निवडणूक लढणार असून त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी चांदूर रेल्वेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दाखल केले. त्यापूर्वी घुईखेडकर यांची चांदूर रेल्वे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास संताबाई यादव मंगल कार्यालयापासून अमरावती रोडमार्गे क्रांती चौक होत चंद्रशेखर आझाद चौकात पोहचली. तेथून रॅली जुना बस स्टॅन्डकडे आली व दुपारी १.३० वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहचली.

हेही वाचा- शिवसेनेकडून प्रिती बंड यांची बडनेरा मतदारसंघावर वर्णी, रवी राणा यांना डावलले

यावेळी त्यांच्या समर्थकांनी नारेबाजी करीत त्यांचे मनोबल वाढविले. तसेच सर्मथकांनी त्यांना खांद्यावर उचलून कार्यालयाच्या गेटपर्यंत नेले. त्यानंतर प्रवीण घुईखेडकर यांना व त्यांच्या चार समर्थकांना कार्यालयाच्या आत जाण्यास परवानगी मिळाली. तसेच रिपाई (आठवले गट) तर्फे नानासाहेब डोंगरे यांनीसुध्दा उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी ४ उमेदवारांनी ९ नामनिर्देशन पत्रांची उचल केली आहे.

Intro:

अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडाळी

बंडखोरी करीत प्रवीण घुईखेडकर यांचे नामनिर्देशन दाखल

अमरावती अँकर

धामणगाव रेल्वे मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची आता गर्दी होत असताना मंगळवारी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी अपक्ष नामनिर्देशन पत्र हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने दाखल केले आहे. घुईखेडकर यांच्या बंडखोरीमध्ये काँग्रेसला मोठे भगदाड पडले असुन याचा फटका विद्यमान काँग्रेसच्या आमदारांना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी धामणगाव रेल्वे मतदारसंघातून मुळचे काँग्रेसचे असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुईखेडकर यांनी नामांकन अर्ज उचलला होता. ते अपक्ष निवडणुक लढणार असून त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी चांदूर रेल्वेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल केला. यापूर्वी घुईखेडकर यांची चांदूर रेल्वे शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. ही रॅली दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास संताबाई यादव मंगल कार्यालयापासून अमरावती रोडमार्गे क्रांती चौक होत चंद्रशेखर आझाद चौक येथुन रॅली पुढे जुना बस स्टॅन्ड कडे आली व शेवटी १.३० वाजताच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ पोहचली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी नारेबाजी करीत त्यांचे मनोबल वाढविले. तसेच सर्मथकांनी त्यांना खांद्यावर उचलुन कार्यालयाच्या गेटपर्यंत नेले. त्यानंतर प्रवीण घुईखेडकर यांना त्यांच्या चार समर्थकांना आत जाण्यास परवानगी मिळाली. तसेच रिपाई (आठवले गट) तर्फे नानासाहेब डोंगरे यांनी सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी ४ उमेदवारांनी ९ नामनिर्देशन पत्राची उचल केली आहे.

Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.