अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींना 'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. सद्यपरिस्थितीत मुलींवर होणारे अत्याचार, अॅसीड हल्ले पाहता शिक्षकांकडून मुलींना ही शपथ देण्यात आली होती. याबाबत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विट करून मुलींऐवजी मुलांनीच शपथ घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
-
त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एक तर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही ,देणार कोणावर ऍसिड फेकणार नाही ,जिवंत जळणार नाही वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एक तर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही ,देणार कोणावर ऍसिड फेकणार नाही ,जिवंत जळणार नाही वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 14, 2020त्या पेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की एक तर्फी प्रेमातून मुलींना त्रास नाही ,देणार कोणावर ऍसिड फेकणार नाही ,जिवंत जळणार नाही वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार ..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) February 14, 2020
त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला पाहिजे की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही, कोणावर अॅसिड फेकणार नाही, जिवंत जाळणार नाही, वाकड्या नजरेने मुलींकडे बघणार नाही आणि जर कोणी बघितलं तर त्याला जबरदस्त जवाब देणार, असे ट्विट त्यांनी या घटनेसंदर्भात केले आहे. त्यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत, शाळेत मुलींना प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. शपथ मुलींनाच का? आणि तीही प्रेम न करण्याची?
हेही वाचा - मी शपथ घेते की.. महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली कधीही प्रेमविवाह न करण्याची शपथ
महिला कला वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर टेंभुर्णी गावात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मुलींनी अशी शपथ घेतली. प्राध्यापक प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. शपथ देण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर दंदे यांनी भाषण केले होते.