ETV Bharat / state

४ फुटाच्या मूर्तीने कोरोना होत नाही, मग ६ फुटाच्या मूर्तीने होतो का - माजी मंत्री अनिल बोंडे - former minister anil bonde amravati

मोहर्रममध्ये संदल काढताना कोणत्याही फुटाचे बंधन नव्हते, परंतु दुर्गादेवीच्या मूर्तींना ४ फुटाचे बंधन घालून सर्व मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ आली. ४ फुटाच्या मूर्तीने कोरोना होत नाही आणि ७ फुटाच्या मूर्तीने कोरोना होतो, हे न उलगडणारे कोडे आहे. दुर्गा देवीच्या उंचीची मर्यादा ४ फुटावरून ७ फुटावर करण्यात यावी व मूर्तीकारांवरील अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

माजी मंत्री अनिल बोंडे
माजी मंत्री अनिल बोंडे
author img

By

Published : Oct 5, 2020, 6:49 PM IST

अमरावती- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवरात्री उत्सवासाठी काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या मध्ये मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना काही मार्गदर्शक सूचना आहेत. ज्यात दुर्गादेवी व लक्ष्मीची मूर्ती ४ फुटांची असावी. त्यापेक्षा मोठी असल्यास त्या मूर्तीकाराकडून १५ हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश आहे. परंतु, शासनाच्या या आदेशावर माजी मंत्री अनिल बोंडे यांनी टीका केली असून, ४ फुटांच्या मूर्तीने कोरोना होत नाही, मग ६ फुटांच्या मूर्तीने कोरोना होतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

माहिती देताना माजी मंत्री अनिल बोंडे

शासनाच्या या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून आज माजी कृषिमंत्री व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हातील मूर्तिकारांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. यावर्षी कोरोनामुळे सर्व मूर्तिकारांचे नुकसान झाले आहे. गणपती उत्सवात देखील मूर्तीच्या उंचीवर काही बंधने होती. त्यामुळे, आधी तयार केलेल्या मूर्ती तशाच पडून आहेत. त्यात आता नवरात्रीसाठी मार्गदर्शक सूचना असल्याने आधी तयार केलेल्या दुर्गा देवीच्या मूर्ती देखील पडून आहेत. त्यातच कारवाईच्या भीतीने मंडळे मूर्तीकारांना दिलेली बुकिंग रद्द करीत आहेत. त्यामुळे, मूर्तीकारांना नुकसान होणार, असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले.

मोहर्रममध्ये संदल काढताना कोणत्याही फुटाचे बंधन नव्हते, परंतु दुर्गादेवीच्या मूर्तींना ४ फुटाचे बंधन घालून सर्व मूर्तीकारांवर उपासमारीची वेळ आली. ४ फुटाच्या मूर्तीने कोरोना होत नाही आणि ७ फुटाच्या मूर्तीने कोरोना होतो, हे न उलगडणारे कोडे आहे. दुर्गा देवीच्या उंचीची मर्यादा ४ फुटावरून ७ फुटावर करण्यात यावी व मूर्तिकारांवरील अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी डॉ. अनिल बोंडे यांनी केली. यावेळी अमरावती जिल्हा भाजप शहर अध्यक्ष किरण पातुरकर, भाजप अमरावती ग्रामीणचे सरचिटणीस प्रा. सुमित पवार, ललित समदूरकरसह मूर्तिकार उपस्थित होते.

हेही वाचा-शेत मार्गावर महिलेचे अतिक्रमण; 20 जणांचा शेतमाल बाहेर आणायचा कसा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.