अमरावती - आदिवासी बांधवांचा वर्षातला सर्वात मोठा सण असलेला होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे होळीच्या सणासाठी सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांची लगभग सुरू झाली असल्याने सर्वत्र हर्षउल्हासाचे वातावरण मेळघाटात आहे. कामाच्या शोधात स्थलांतर करणारे मेळघाटातील हजारो आदिवासी आता होळीच्या सणाच्या निमित्ताने परतीच्या मार्गावर आहे. दरम्यान मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी हिराराल चौधरी एका लग्नात गेले असता त्यांनी आदिवासी बांधवां सोबत गड्यात ढोलकी घालून चांगला ठेका धरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मेळघाटात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लग्न समारंभात धरला आदिवासी नृत्यांवर ठेका.. पारंपरिक वेशभूषा कायम -मेळघाट हा जैवविविधतेने नटलेला भाग आहे. या भागात 80 टक्के लोक हे स्थानिक आदिवासी बांधव आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशात त्या त्या भागातील वैशिष्ट्य आजही कायम आहे. कोरकू आदिवासी बांधवांचा पिढ्यानपिढ्या चालत असलेले पारंपारिक आदिवासी आजही कायम आहे. सर्व शुभ प्रसंगांमध्ये लग्नाच्या वेळी उत्सव समारंभात स्त्री-पुरुष समूहांमध्ये या नृत्याचा आनंद घेतात. प्रामुख्याने भडक बंडी, कोट, धोतर घालतात. तसेच डोक्यावर पगडी बांधून त्यात खोपा रोवला जातो. या नृत्यासाठी मुली व महिला लाल रंगाची साडी परिधान करून पारंपारिक अलंकार घालतात. होळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मेळघाटच्या खोऱ्यात तयारी सुरू झाली आहे. अनेक आदिवासी हे नृत्यांवर ताल धरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागाच्या ढाकणा वनपरिक्षेत्रात कर्तव्यावर असलेले वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी देखील एका लग्नात नृत्याचा मनसोक्त आनंद घेतला आहे..
..म्हणून मी नृत्य केले -मेळघाटातील आदिवासी बांधव आपल्या सण-उत्सवात, लग्नसमारंभात आवर्जून बोलवतात. मीदेखील ही अतिशय उत्साहाने, आनंदाने आणि आपुलकीने त्यात सहभागी होतो. त्यामुळे मला त्यांच्या पारंपरिक जीवनशैलीत काही प्रमाणात भाग घेण्याची संधी मिळते व त्यांना देखील मी त्यांच्या परिवाराचा भाग वाटतो. याचा परिणाम असा झाला की वनविभागाचे आणि स्थानिक लोकांमधे सौदार्हाचे वातावरण तयार होते. शिवाय बऱ्याच वेळी वनगुन्ह्यांना देखील आळा बसतोय काही अवैध घडणार असेल तर लोक आम्हाला आधिच सांगतात आणि म्हणतात "जांगडी" (बोलीभाषेत साहेब) अपना आदमी है . त्यामुळे मी देखील आवर्जुन अशा समारंभात जातो. काही दिवसांपूर्वी असचं मला एका लग्न समारंभात आमंत्रित करण्यात आले होते, तिथे कोरकू बांधवांनी पारंपरिक लोकनृत्य "गदली-सुसुन" वर ठेका धरला होता. या लोकनृत्याचा ताल हा इतका लाजवाब आहे की कोणालाही आपल्या तालावर नाचण्यास भाग पडतो. त्यामुळे मी कुठलीही तमा न बाळगता या नृत्यप्रकारात सामील झालो आणि मनमुराद आनंद लुटला.
हेही वाचा - मृतात्म्यांना मोक्षप्राप्ती करून देणारा अवलिया