अमरावती - अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आज (सोमवार) ५३वा पुण्यतिथी महोत्सव होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण 11 ऑक्टोबर 1968 रोजी 5 वाजताच्या दरम्यान गुरुकुंज मोझरीत झाले होते. मागील 53 वर्षेपासून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील उपस्थित लावली.
- शहिद जवानांना, कोरोनात जीव गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली -
तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार आणि कार्याने प्रेरित झालेले देशभरातील अनुयायी हे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमध्ये त्यांच्या महासमाधी स्थळी उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी संत तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली वाहिली. तसेच देशासाठी शहिद झालेल्या जवानांना व कोरोना काळात जीव गमावणाऱ्या कोरोना योद्धांना देखील या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.
- तुकडोजी महाराजांनी गायलेली भजनाचा कार्यक्रम -
१९ तारखेपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी या पुण्यतिथी महोत्सवात प्रारंभ झाला होता. या पुण्यतिथी महोत्सवातील सर्वात महत्वाचा हृदस्पर्शी असलेला मौन श्रद्धांजलीचा सोहळा आज (सोमवारी) पार पडला. तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली वाहताना गुरुदेव भक्तानी आपल्या अश्रूंणा वाट मोकळी करून दिली. गुरुकुंजात सर्वधर्म समभावाच प्रतीक असलेल्या प्रार्थना मंदिर परिसरात साडे तीन वाजतापासून 'गुरुदेव हमारा प्यार' हे प्रार्थना गीत गाऊन श्रद्धांजली कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी तुकडोजी महाराजांनी गायलेली भजने सादर करण्यात आली. मौन श्रद्धांजली नंतर सर्वधर्माच्या प्रार्थना येथे झाल्या.
हेही वाचा - जागतिक कलावंत दिन : रंगभूमीवर पुन्हा नाटकांची तिसरी घंटा वाजू दे