ETV Bharat / state

मोर्शी पूर : घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत

पुराची माहिती मिळताच तत्परता दाखवत पालकमंत्री अनिल बोंडेंनी मदतीची घोषणा केली. मात्र, राहण्याचे तर सोडाच पण खाण्यासाठी अन्नाचीही सोय झाली नसल्याची खंत पूरग्रस्तांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

अमरावतीमध्ये पूर
author img

By

Published : Sep 7, 2019, 7:45 PM IST

Updated : Sep 7, 2019, 8:33 PM IST

अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी परिसर आणि सातपुडा पर्वत रांगेमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोर्शी शहराजवळून वाहणाऱ्या नळ आणि दमयंती या नद्यांना पूर आला आहे. पुराचे पाणी शहरात शिरले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शाळा आणि घरात पाणी शिरल्यामुळे जीवनोपयोगी साहित्याची नासाडी झाली आहे.

मोर्शीत मुसळधार पावसामुळे पूर

हेही वाचा - मोर्शीतील पुरातून सुरक्षित स्थळी हलवलेल्या गणरायाची पुन्हा स्थापना, व्हिडिओ व्हायरल

पुराची माहिती मिळताच तत्परता दाखवत पालकमंत्री अनिल बोंडेंनी मदतीची घोषणा केली. मात्र, राहण्याचे तर सोडाच पण खाण्यासाठी अन्नाचीही सोय झाली नसल्याची खंत पूरग्रस्तांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा - अप्पर वर्धा धरणाचा साठा 94 टक्क्यांवर; धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता

हा पूर इतका भयानक होता की, या पुराचा विघ्नहर्त्या गणपतीलाही सामना करावा लागला. त्यामुळेच पूरग्रस्त कुटुंबाना मदत म्हणून पहिल्या टप्प्यात 5 हजार रुपये देणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे.

Intro:मोर्शीच्या महापुरातील पूरग्रस्तांची दयनीय अवस्था, मोडलेला संसार कसा उभारावा हा प्रश्न.
--------------------------------------------------------------------
अमरावती स्पेशल स्टोरी

अमरावती अँकर
बुधवारी सातपुडा पर्वत रांगा व ,अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे नळ आणि दमयंती या दोन्ही नद्या कोपल्या नदीला महापूर आला आणि अमरावतीच्या मोर्शी शहरातील काही भाग अख्खा पाण्याखाली गेला.52 वर्षात कधीही न कोपणारी नळ दमयंती माय कोपली आणि पाण्या बरोबरच अनेकांचे आयुष्य उध्वस्त करून गेली. जवळपास 900 कुटूंबाच नुकसान या पुराने झाले.पै पै गोळा केलेले पैसे ,धान्य, कपडे,दागिने जनावरे सर्वच या पुरात वाहून गेले.आयुष्याची शिदोरीच पुराणे आपल्या कवेत घेतल्याने.आधीच फाटलेला संसार पुराने तर अख्या मोडूनच टाकल्याने आता संसार उभा करावा तरी कसा ?? असा प्रश्न या पूरग्रस्त लोकांना पडला.
 पाहूया ETV भारत चा हा ग्राउंड रिपोर्ट...

Vo-1
शेकडो फुटवरून वाहत आलेला हा ऑटो,पलटी झालेली ही ट्रॅक्टरची ट्रॉली ,भुईसपाट झालेल्या भिंती,दाव्याला बांधलेली ही मृत जनावर, ओल झालेलं हे धान्य आणि मदतीसाठी आसुसलेले चेहरे आणि डोळ्यात दाटून आलेले आसवांचे ढग ही परिस्थिती कोल्हापूर किंवा सांगलीची नाही तर ही परिस्थिती आहे .अमरावतीच्या मोर्शी शहरातील पेठ पुऱ्यातील चार तासाच्या पाण्यामुळे आलेल्या पुरामुळे सर्वस्व गमावणार्या कुटुंबाची.

बाईट-1-महिला पूरग्रस्त

Vo-2
बुधावारी दुपारी चार वाजता आलेल्या पुरामुळे शेकडो घरात पाणी शिरलं वर्षभरासाठी मोलमजुरी करून घरात भरून ठेवलेले धान्य पुरात वाहून गेलं, आयुष्याची शीदोरी म्हणून जमा केलेलं सोन नाणं ही यात गेलं ,कुणाच्या भिंती पडल्या तर कुणाच्या घरात कमरे एवढं पाणी होत.

बाईट -2 महिला पूरग्रस्त 

Vo-3
एका कुटुंबाने तर मोलमजुरी करून हक्काचा निवारा उभा केला होता,गुण्या गोविंदाणे नांदनाऱ्या या परिवाराचा निवारा तर भुईसपाट झाला.

बाईट-3- पुरुष पूरग्रस्त

Vo-4
या भयंकर महापूराची माहिती मिळताच तत्परता दाखवत मुबंई वरून मोर्शी मध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी मदतीची घोषणा केली .परन्तु राहायला व्यवस्था नाही ,खायला अन्न नाही ,तर कुठलीही मदत मिळालीच नसल्याच पूरग्रस्तांच म्हणणं आहे.

बाईट-4-महिला पूरग्रस्त

Vo-5
पूर एवढा भयंकर होता की विघ्नहर्त्या गणपतीलाही या पुराचं विघ्न सहन करावं लागलं.दरम्यान पूरग्रस्त कुटूंबाना पहिला टप्पा म्हणून पाच हजार रुपये देणार असल्याच तहसीलदार यांनी सांगितले.

बाईट-5- तहसीलदार मोर्शी

Vo-6
दरम्यान आता शासनाची तुटपुंजी मदतही मिळेल त्यासाठी शासनाचे दरवाजे ही खटखटावे लागेल पण सर्वस्व गमावलेल्या या कुटूंबाना गरज आहे ती मोठ्या आधाराची आपल्या मदतीची....

 स्वप्निल उमप -etv भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 7, 2019, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.