ETV Bharat / state

लाकूड बाजारात लागलेल्या आगीत ७ ते ८ दुकाने जळून खाक, लाखोंचे नुकसान

परतवाड्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लाकूड बाजाराला लागलेल्या आगीत ७ ते ८ दुकाने जळून खाक झाली. या घटनेत दुकानातील लाखो रुपयांच्या लाकूड साहित्याचे नुकसान झाले आहे.

timber market
लाकूड बाजाराला आग
author img

By

Published : Nov 27, 2019, 10:36 AM IST

अमरावती - जिल्ह्यातील परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या लाकूड बाजाराला मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत बाजार पेठेतील ७ ते ८ लाकूड साहित्याची दुकाने जळून खाक झाली आहेत. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच अचलपूर नगरपरिषद, चांदूर बाजार नगरपरिषद व दर्यापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.

जयस्तंभ चौकातील लाकूड मार्केटला आग

अमरावतीच्या परतवाडा शहरात मोठी लाकूड बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत लाकूड साहित्य (फर्निचर) मोठ्या प्रमाणावर बनवले जाते. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असल्याने येथील व्यवसायिकांनी फर्निचरचे साहित्य मोठ्या प्रमाणावर बनवून ठेवले होते. पण, काल मध्यरात्री दीडच्या सुमारास या बाजारपेठेत अचानक आग लागली. त्यामुळे लाखो रुपये किंमतीचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच अचलपूर, चांदूर बाजार व दर्यापूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. तर, याआधी सुद्धा येथील लाकूड बाजारात अशाच प्रकारे आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परत परत अशा घटना होऊ नये याकरता प्रयत्न केले जातील का, नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा - नागपूर-मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या निर्माणधीन पुलावरून ३ कामगार पडले

हेही वाचा - नानीका हसन हत्या प्रकरणातील सहा आरोपींना दोन तासात अटक

Intro:अमरावती: परतवाडा येथे लाकूड बाजाराला भीषण आग.
सात ते आठ दुकाने जळून खाक लाखोंचे नुकसान.
-----------------------------------------------
अमरावती अँकर
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील जयस्तंभ चौकात असलेल्या लाकूड मार्केट ला आज मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या भीषण आगीत बाजार पेठेतील सात ते आठ फर्निचरचे दुकाने जळून खाक झाली असून यामध्ये करोडो रुपयाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अचलपूर नगरपरिषदेच्या चांदूर बाजार नगरपरिषदेच्या व दर्यापूर नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्राने आग आटोक्यात आणली.

अमरावतीच्या परतवाडा शहरात मोठी लाकूड बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत फर्निचर चे साहित्य मोठ्या प्रमाणावर बनवले जाते .सध्या लग्न प्रसंगाचे सिझन सुरू असल्याने येथील व्यवसायिकांनी फर्निचर चे साहित्य मोठ्या प्रमाणावर बनवून ठेवले होते.परन्तु काल मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास या बाजारपेठेत अचानक आग लागली त्यामुळे लाखो रुपये किंमतीचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.या अगोदर सुद्धा या लाकूड बाजारात आग लागली होती..Body:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.