ETV Bharat / state

अमरावतीत एकाच गावात जनावरांच्या आठ गोठ्यांना आग.. लाखोंचे शेतीपयोगी साहित्य खाक

अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा या गावात आज दुपारच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत एका गाईंसह वासराचा होरपळून मृत्यू झाला. एकापाठोपाठ ८ गोठ्यांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे वैरण, बांधकाम व शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.

Fire breaks out in eight cattle sheds
Fire breaks out in eight cattle sheds
author img

By

Published : Apr 10, 2021, 7:18 PM IST

Updated : Apr 10, 2021, 7:28 PM IST

अमरावती - अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा या गावात आज दुपारच्या सुमारास गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत एका गाईंसह वासराचा होरपळून मृत्यू झाला. एकापाठोपाठ ८ गोठ्यांना लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे वैरण, बांधकाम व शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले.

आज दुपारच्या सुमारास एकदरा येथे गावालगतच्या नागमोते लेआऊट मधील जनावरांच्या ८ गोठ्यांना अचानक आग लागली. दुपारची वेळ असल्याने सर्वत्र सामसूम होते. आग लागली त्यावेळी गोठ्यात जनावरे बांधलेली होती. गोठ्यांमधून धूर निघत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. लागलीच गावकऱ्यांनी गोठ्यांकडे धाव घेतली व आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीची माहिती वरुड व शेंदुर जनाघाट येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविली.

अमरावतीत एकाच गावात जनावरांच्या आठ गोठ्यांना आग
या घटनेमध्ये बाल्या पावडे, वासुदेव राऊत, रामाजी मांडे, वासुदेव वाहेकर, रवी ठाकरे, युवराज चौधरी, ओंकार चौधरी, हरिहर चौधरी या ८ शेतकऱ्यांचे गोठे जळून खाक झाले. आग लागली तेव्हा या गोठ्यामध्ये बांधलेली जनावरे व बकऱ्या गावकऱ्यांनी सोडल्या त्यामुळे जनावरांचे प्राण वाचले. मात्र बालु पावडे यांच्या गोठ्यात बांधलेली गाय व वासरु आगीच्या ज्वाला पसरल्याने गोठ्यातून सोडणे शक्य झाले नाही. त्यामुळे आगीत होरपळून गाय वासराचा मृत्यू झाला.यावेळी आमदार देवेंद्र भुयार, ठाणेदार प्रदीप चौगावकर, वंचित आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुशिल बेले, सरपंच जयश्री ठाकरे, उपसरपंच शोभा गोहत्रे, पोलीस पाटील जया सातपुते आदींनी भेटी दिल्या. या आगीमध्ये ८ शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य, जनावरांचे वैरण तसेच काहींनी बांधकामाकरीता आणलेले साहित्य जळुन खाक झाले.

Last Updated : Apr 10, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.