ETV Bharat / state

..अखेर आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल - शिक्षक आमदार श्रीकांत देशमुख

आमदार श्रीकांत देशपांडे यांनी परवानगी नसताना प्रचारसभा आयोजित करून निवडणूक नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह प्रचार सभेत सहभागी उच्च तंत्र व शिक्षणमंत्री उदय सावंत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या उमेदवर संगीता शिंदे यांनी केली होती.

finally-a-case-was-filed-against-mla-shrikant-deshpande
...अखेर आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
author img

By

Published : Nov 21, 2020, 4:13 AM IST

अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार श्रीकांत देशपांडे यांनी परवानगी नसताना प्रचारसभा आयोजित करून निवडणूक नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यासह प्रचार सभेत सहभागी उच्च तंत्र व शिक्षणमंत्री उदय सावंत, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी करत शिक्षण संघर्ष संघटनेच्या उमेदवर संगीता शिंदे यांनी शुक्रवारी दिवसभर विभागीय आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले. तसेच नियमांचा भंग केल्या प्रकरणात आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात अखेर श्रीकांत देशपांडे यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे.

आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीता शिंदे यांची तक्रार-
कोरोनामुळे राज्यात साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, फौजदारी प्रक्रिया संहिता 1972 चे कलम 144 लागू असल्याने निवडणूक प्रचारासाठी सभा घेण्यास परवानगी नाही, असे असताना 19 नोव्हेंबर रोजी श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी मंत्री उदय सामंत, पालकमंत्री यशोमती ठाकूर, तसेच बच्चू कडू यांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. हा प्रकार कायद्याचा भंग करणारा असल्याने उमेद्वारासह सर्व उपस्थित मंत्र्यांवर गुन्हे दाखल व्हावे, अशी मागणी संगीता शिंदे यांनी केली होती.
राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-

विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्या आदेशानुसार संगीता शिंदे यांच्या तक्रारीनुसार तातडीने चौकशी करण्यात आली. चौकशी अहवाल प्राप्त होताच आचारसहिंता भरारी पथकाचे प्रमुख रणजित भोसले यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी भांद्विच्या कलम 188, 269, 270, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51(ब), साथीचे रोग अधिनियम 2,3,4 अन्वये गुन्हा दाखल केला आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.