अमरावती- आज सकाळी 15 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्येने पाचशेचा टप्पा पार केला आहे.अमरावतीमधील कोरोनाबाधितांची संख्या 501 झाली आहे. 15 कोरोनाबाधित रुग्ण वाढल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी केवळ चार कोरोना रुग्ण आढळून आले होते.
आज वाढलेल्या 15 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये राहटगाव परिसरातील 26 वर्षीय युवक आणि जुन्या पावर हाऊस लगतच्या अशोक नगर परिसरातील 18 वर्षाचा युवक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यासोबतच दंत महाविद्यालय परिसरातील मेहरबाबा कॉलनी येथील 21 वर्षीय पुरुष आणि रुक्मिणीनगर परिसरातील 32 वर्षांच्या महिलेला कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
परतवाडा येथील शिरभाते नगर परिसरात 10 वर्षीय बालिका,अंजनगाव सुर्जी येथील 52 वर्षीय पुरुष, वसुंधरा कॉलनी येथे राहणारी 20 वर्षांची युवती, वलगाव येथील 34 वर्षीय महिला, साबणपुरा येथील 40 वर्षांची महिला, राजकमल चौक येथील 52 वर्षांची महिला, गुलिस्ता नगर येथील 52 वर्षाचा पुरुष, मोर्शी तालुक्यात येणाऱ्या विचोरी येथील 27 आणि 26 वर्षाच्या पुरुषांसह 24 वर्षाच्या महिलेला कोरोना झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.
शनिवारी सकाळी 15 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त होताच खळबळ उडाली आहे. अमरावतीत कोरोनाचा पहिला रुग्ण 03 एप्रिलला आढळून आला होता. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 501 वर पोहोचली असून ही संख्या वाढण्याची भीती कायम आहे.