ETV Bharat / state

'कृषीमंत्र्यांच्या घरावरील मोर्चा म्हणजे विरोधकांची नौटंकी'

कृषीमंत्र्यांच्या घरावर काढलेला मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता, असा आरोप भाजपचे वरुड-मोर्शी तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी केला.

राजकुमार राऊत
author img

By

Published : Jul 17, 2019, 6:25 PM IST

अमरावती - काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज भव्य मोर्चा काढत कृषीमंत्र्यांचा निषेध केला. त्यानंतर भाजपचे वरुड-मोर्शी तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत यांनी मोर्चेकरांवर टीका केली. विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते नौटंकी करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

कृषीमंत्र्यांच्या घरावरील मोर्चाबाबत माहिती देताना भाजप पदाधिकारी राजकुमार राऊत आणि कृषीमंत्री बोंडे यांच्या पत्नी

कृषीमंत्र्यांच्या घरावर काढलेला मोर्चा शेतकऱ्यांचा नसून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता. ज्या नेत्यांनी मोर्चा काढला त्यांची दुकानदारी बंद पडलेली आहे. आगामी निवडणुकीत ती दुकाने चालू करुन लोकांना आपल्या पाठीशी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, वरुड मोर्शी तालुक्यातील जनता ही बोंडे यांच्या पाठीमागे उभी आहे, असेही राऊत म्हणाले.

यावेळी बोंडे यांच्या पत्नी वसुधा यांनी दुष्काळग्रस्त भागात शासनातर्फे दिल्या जाणारा निधी वरुड-मोर्शी तालुक्यात पोचला असल्याची माहिती दिली. तर उर्वरित मागण्यांबाबत कृषीमंत्र्यांचे प्रयत्न सुरू असून यावर लवकरात लवकर तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

Intro:कृषिमंत्र्यांच्या घरावरील मोर्चा शेतकऱ्यांचा नसून,काँग्रेस राष्ट्रवादीची केवळ नौटंकी-भाजप

अमरावती अँकर
आज अमरावतीच्या वरुड मध्ये कृषिमंत्री डॉ अनिल bonde यांच्या घरावर काँग्रेस ,राष्ट्रवादी, व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भव्य मोर्चा काढत कृषी मंत्री अनिल bonde यांचा निषेध केला .दरम्यान घरावर काढलेला मोर्चा हा शेतकऱ्यांचा नसून काँग्रेस ,राष्ट्रवादी,आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा होता.काही दिवसांवर होणाऱ्या निवडणुका पाहता या तिन्ही पक्षाच्या पायाखालची वाळू सरकल्याने ही काँग्रेस राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केवळ नौटंकी असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुका अध्यक्ष राजकुमार राऊत यांनी दिली.

ज्या नेत्यानी मोर्चा काढला त्यांची दुकानदारी बंद पडलेली आहे आगामी निवडणुकीत ती दुकाने चालू करून लोकांना आपल्या पाठीशी घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.परन्तु वरुड मोर्शी तालुक्यातील जनता ही डॉ अनिल bonde यांच्या पाठीमागे उभी आहे असही राऊत म्हणाले..

बाईट -राजकुमार राऊत-भाजप

Vo - यावेळी कृषिमंत्री डॉ अनिल bonde यांच्या पत्नी सौ वसुधा bonde दुष्काळग्रस्त भागात शासनातर्फे दिल्या जाणारा निधी वरूड - मोर्शी तालुक्यात पोचला असल्याची माहिती त्यांनी दिली तर उर्वरित मागण्यांबाबत कृषिमंत्र्यांचे प्रयत्न सुरु असून यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असा विश्वास वसुधा बोन्डे यांनी यावेळी व्यक्त केला.

बाईट-वसुधा bondeBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.