ETV Bharat / state

'शेतकऱ्यांनी जैविक शेती करून उत्पादनात भर पाडावी'

author img

By

Published : Jan 30, 2020, 10:11 AM IST

अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथील तज्ज्ञ यांनी मार्गर्शन केले.

Amravati
अमरावती

अमरावती - कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची शेती करताना आपला खर्च कमी करून जैव विविधता जपली पाहिजे. रासायनिक शेती न करता जैविक शेती करून शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनात भर पाडावी, असे आवाहन सुधारित कापूस यंत्रणा बीसीआयकडून करण्यात आले आहे. चांदुर रेल्वे तालुक्यातील आमला गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

आमला गावात शेतकरी मेळाव्याचे आयोजन

या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामधे फवारणीसाठी दशपर्णी अर्क, अमृत पाणी, निंबोळी अर्क, कंपोस्ट खत, गांडूळ खत, जीवामृत यांसारखी जैविक औषधे रांगोळीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दाखवण्यात आली.

कपाशीतील 2 झाडामधील अंतर कमी करून उत्पादन वाढावे, यासाठी फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत शेतकऱ्यांना यावेळी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. तर या प्रात्यक्षिकामुळे नक्कीच फायदा होईल, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

Intro::कमी खर्चात शेती करुण पर्यावरण वाचवा, सुधारित कापूस यंत्रणेचे शेतकरी मेळाव्यात आव्हान

अँकर:
-कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाची शेती करताना आपला खर्च कमी करून जैव विविधता जपली पाहिजे व रासायनिक शेती न करता जैविक शेती शेतकऱ्यांनी करून आपली उत्पादनात भर पडावी यासाठी अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात आमला या गावी सुधारित कापूस यंत्रणा बीसीआय यांनी शेतकरी मेळाव्यात मार्गर्शन केले.यावेळी शेतकऱयांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.यामधे फवरणी साठी दशपर्णी अर्क,अमृत पाणी,निबोळी अर्क,कंपोस्ट खत,गांडूळ खत,जीवामृत यांसारख्या जैविक औषधें हे रांगोळीच्या साहाय्याने शेतकऱ्याना दाखविण्यात आले. कपाशीतील दोन झाडातील अंतर कमी करून उत्पादन वाढावे फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्याना यावेळी प्रत्यक्षिकातून मर्गदर्शन करण्यात आले.सोबतच कृषी अधिकारी,कृषी विज्ञान केंद्र घातखेड येथील तज्ञ यांनी मार्गर्शन केले.या प्रत्यक्षिकातून आम्हाला कापूस उत्पादनात नक्की फायदा होईल अशी प्रतिक्रिया या वेळी शेतकऱयांनी दिली.
बाईट:-अजय शेळके शेतकरी
बाईट:-राजीव खरबळे शेतकरीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.