अमरावती - शेतात पेरणी केलेले बियाने रानडुक्कर ,रोही, हरिण खात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणुन एका शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. आपल्या शेतीच्या संरक्षणासाठी ( seeds to protect ) अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात येणाऱ्या शिरसगाव बंड ( Shirasgaon Rebellion in Chandurbazar Taluk ) येथील शेतकऱ्याने चक्क वन्य प्राण्यांपासून सुरक्षित राहावे म्हणुन आपल्या शेतात पेरलेल्या बियाणाला शाम्पू ( Shampoo used seeds ) लावण्यात आला आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून शेतात पेरलेले बियाणे सुरक्षित ( To protect the seeds Use of shampoo ) असून त्यांचे उत्पादन वाढण्याची शक्याता आहे.
असा केला प्रयोग - शिरजगाव बंड येथील शेतकरी मनोज निंभोरकर यांनी आपल्या शेतात हरभरा तूर सोयाबीन या बियाण्यांची पेरणी करताना या बियाण्यांना पेरणीपूर्वी शाम्पूने भिजवले. एक किलो बियाणासाठी एक रुपयांच्या शाम्पू ची पुडी त्यांनी वापरली. या बियाण्यांना शाम्पू लावल्यावर अर्धाने त्यांची शेतात पेरणी करण्यात आली. गत अनेक वर्षांपासून शेतात येणारे रानडुक्कर रोही पेरलेले बियाणे उकडून ते खाऊन घेत असल्यामुळे शेतीचा उत्पन्नात मोठा फटका बसायचा.
प्राणी हळूहळू येणे बंद - या प्रयोगामुळे प्राण्यांनी शाम्पू लावलेले बियाणे उकरून खाल्ल्याबरोबर त्यांच्या तोंडात असलेल्या लाळेत हे बियाणे मिसळतात त्यामुळे त्यांच्या तोंडाला फेस येतो. तोंडाला फेस फेस आल्याने प्राण्यांना भीती वाटायला लागली. यामुळे हे बियाणे खाणे घातक असल्याचे समजून प्राण्यांनी शेत उकरणे सोडून दिले. शेतातील बियाणे खाल्ल्याने गंभीर परिणाम होतो अशी धास्ती या प्राण्यांना बसल्यामुळे आमच्या शेतात येणारे हे प्राणी हळूहळू येणे बंद झाले असे मनोज निंभोरकर ईटीव्ही भारत शी बोलताना म्हणाले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली असल्याचे देखील मनोज निंभोरकर यांनी सांगितले.
अशी सुचली कल्पना - दोन वर्षांपूर्वी मनोज निंभोरकर यांनी आपली कार धुण्यासाठी एका वॉशिंग सेंटरवर नेली होती. या ठिकाणी केवळ एक रुपयाची शॅम्पू वापरून वॉशिंग सेंटर वरील व्यक्तीने आपली गाडी चकाचक धुऊन दिली. आपली गाडी धुताना पाहून सहज म्हणून बियाण्यांना शाम्पू लावून पेरणी केली तर हे बियाणे वन्यप्राणी खाणार नाही अशी कल्पना सुचली. यानंतर शेतातील केवळ चार तासांमध्ये हरभरा पेरताना त्याला शाम्पू लावले. रानडुकरांनी पेरलेले बियाणे खाताच त्यांच्या तोंडाला फेस आल्याने त्यांनी पुन्हा शेतात येऊन हरभऱ्याचे नुकसान केले नाही. आपली कल्पना खरंच कामात आली याचा आनंद झाला. यावर्षी देखील संपूर्ण शेतात पेरणी करताना बियाण्यांना शाम्पू लावले असे मनोज निंभोरकर यांनी सांगितले.
दुष्परिणाम नाही, प्राणी ही सुरक्षित - शाम्पू लावून बियाण्यांची पेरणी केल्यामुळे येणाऱ्या पिकांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. विशेष म्हणजे शेतात येणाऱ्या जनावरांना रोखण्यासाठी अनेकजण विजेचा प्रवाह सोडतात किंवा काही जण विषारी औषधांचा देखील प्रयोग करतात. अशा प्रयोगांमुळे जनावर दगावतात पक्षी देखील मरतात. मात्र, या प्रयोगामुळे कुठल्याही पशुपक्षींची जीवित हानी होत नाही. हा अतिशय महत्त्वाचा फायदा असल्याचे मनोज निंभोरकर म्हणाले. माझ्या प्रमाणे इतर शेतकऱ्यांनी देखील असा प्रयोग निश्चितपणे करावा असे, आव्हान देखील मनोज निंभोरकर यांनीही ' ईटिव्ही भारत ' शी बोलताना केले.