ETV Bharat / state

..म्हणून अमरावतीच्या 'या' गावचे शेतकरी पेरणीच करत नाहीत

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई शेतकरी शेतात पेरणीच करत नाहीत. शेती पेरली तर रोही जनावरांचा त्रास होतो.त्यामुळे शेकडो शेतकरी आपली 500 हुन अधिक एकर जमीन पडीत ठेवतात.

author img

By

Published : Jul 17, 2019, 1:21 PM IST

अमरावतीतील या गावात शेतकरी पेरणीच करीत नाहीत

अमरावती- मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई या गावातील शेतकरी शेतात पेरणीच करत नाहीत. शेती पेरली तर रोही जनावरांचा त्रास होतो. त्यामुळे शेकडो शेतकरी आपली 500 हुन अधिक एकर जमीन पडीक ठेवतात. मागील पाच वर्षापासून वन्य प्राण्यांनी या ठिकाणी उपद्रव सुरू केला. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी ३ वर्षापासून आपली शेती न पेरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या मजूरांना बसला आहे.

मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई शेतकरी शेतात पेरणीच करत नाहीत

वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे कंटाळलेल्या येथील शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. अनेक निवेदने, मोर्चे, आंदोलने काढले परंतु सरकारने नेहमीप्रमाणे या शेतकऱ्यांना आश्वासना शिवाय हाती काहीच लागू दिले नाही. या गावात मोठमोठी बी-बियाणांची 11 दुकाने आहे. परंतु तिही पेरणी अभावी ओस पडलेली आहेत.

या परिसरातील नेर पिंगळाई हे एकटचे गाव नसून परिसरातील 17 गावात वन्य प्राण्यांनी हौदोस घातला आहे.जर शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही तर हे शेतकरी जगणार कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. आम्ही यासाठी अनेकदा आंदोलने केली पण सरकार ने लक्ष दिले नाही.धरणाच्या पाण्यासाठी पालकमंत्री भांडतात आता त्यांचे सरकार आहे. त्यांनी या शेतकऱ्यांची मागणी मंजूर करावी, अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Intro:म्हणून अमरावती जिल्ह्यातील या गावात 500 एकर जमिनीवर 3 वर्षांपासून शेतकरी पेरणीच करीत नाही.

वन्यप्राण्यांच्या त्रासांमुळे शेकडो शेतकऱ्यांची पडीत ठेवण्याचा निर्णय.

----------------------------------------------

  अमरावती अँकर

दरवर्षी जून महिना आला की शेतकऱ्यांची लगबग राहते ती आपली शेती पेरायची, मजुरांनाही आनंद होतो की दोन पैसे हातावर येईल .आणि गावातील कृषी केंद्र दुकानातही मोठी आर्थिक देवाण घेवाण होते परंतु या सर्व गोष्टीं साध्य होतात जेव्हा शेतकरी आपल्या शेतात पेरणी करनार तेव्हा परंतू जिथे 25 टक्के शेतकरी पेरणीच करत नाही ,तिथे मात्र मजुरांच्या हाताला काम राहणार नाही.शेतकरी चिंतेत सापडणार होय हे खरं अमरावती जिल्ह्यात अस एक गाव आहे जिथे शेकडो शेतकरी आपली 500 हुन अधिक एकर जमीन पडीत ठेवतात .नेमकं काय कारण आहे पाहूया etv भारत चा एक रिपोर्ट.

VO-1
हल्ली पावसाळा म्हटलं की ग्रामीण भागातील गावे दिवसभर ओस पडलेली असतात कारण पेरणीचे कामे सुरू असल्याने गावातील मजूर शेतकरी हे शेतावर असतात परंतु अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई गावात उलट परिस्थिती आहे.गेल्या पाच वर्षपासून वन्य प्राण्यांनी हौदोस घातल्याने शेकडो शेतकऱ्यांनी आपली शेती न पेरण्याचा निर्णय गेल्या तीन वर्षांपासून घेतला आहे.

बाईट -1-शेतकरी

VO-2
जिल्ह्यातील अनेक भागात पेरणीचे कामे आटोपून पिकात आंतर माशागतिचे कामे चालू आहे.परन्तु या गावातील अनेक शेतकरी चिंतेत सापडले आहे.शेती पेरली तर आधीच उत्त्पन्न कमी त्यात रोही जनावरांचा त्रास हा जनू नित्याचा झाल्याने तोंडाशी आलेले पीक हे वन्य प्राणी पाडतात त्यामुळे शेतीच पेरू नये असा निर्णय काही शेतकऱ्यांनी घेतला.गावातील 500 एकर शेती पडीत म्हटल्यावर त्याचा परिणाम हा हातवर पोट असणाऱ्या मजूरांना झाला .

बाईट-2 शेतकरी

वन्य प्राण्यांच्या हौदासाने कंटाळलेल्या शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.अनेक निवेदने ,मोर्चे ,आंदोलने काढले परन्तु आपल्या मायबाप सरकार ने नेहमी प्रमाणे या शेतकऱ्यांना आश्वासनचं दिलंय,सरकारचे जर या जनावरांची काळजी वाटत असेल तर आम्हा शेतकऱ्यांच्या पालन पोषणाची जबादारी सरकारने घ्यावी असे शेतकरी म्हणतात.

बाईट-3-शेतकरी

VO-4
नेर या गावात मोठमोठी बी बियाणे ची 11 दुकाने आहे. परन्तु तीही पेरणी अभावी ओस पडलेली.

बाईट-4 -कृषी केंद्र चालक

VO-5
आम्ही यासाठी अनेकदा या आंदोलने केली पण सरकार ने लक्ष दिले नाही.धरणाच्या पाण्यासाठी पालकमंत्री भांडतात आता त्यांचे सरकार आहे त्यांनी या शेतकऱ्यांची मागणी मंजूर करावी अशी मागणी आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

बाईट-5 आमदार यशोमती ठाकूर

या परिसरातील नेर पिंगळाई हे एकटचे गाव नसून परिसरातील 17 गावात वन्य प्राण्यांनी हौदोस घातला आहे.जर शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही तर हे शेतकरी जगणार कसे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

स्वप्निल उमप
Etv भारत अमरावतीBody:अमरावतीConclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.